मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /दिवाळीत टू-व्हीलर घेण्याचा विचार करताय? वाचा Royal Enfield च्या प्रीमियम बाईक्सविषयी...

दिवाळीत टू-व्हीलर घेण्याचा विचार करताय? वाचा Royal Enfield च्या प्रीमियम बाईक्सविषयी...

तुम्ही देखील बाईक खरेदीचा विचार करत असाल तर आता लगेच एखादी बाईक खरेदी न करता काही दिवस थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रॉयल एनफील्ड कंपनी त्यांच्या नवीन बाईक्स दिवाळीप्रसंगी लाँच करतात.

तुम्ही देखील बाईक खरेदीचा विचार करत असाल तर आता लगेच एखादी बाईक खरेदी न करता काही दिवस थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रॉयल एनफील्ड कंपनी त्यांच्या नवीन बाईक्स दिवाळीप्रसंगी लाँच करतात.

तुम्ही देखील बाईक खरेदीचा विचार करत असाल तर आता लगेच एखादी बाईक खरेदी न करता काही दिवस थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रॉयल एनफील्ड कंपनी त्यांच्या नवीन बाईक्स दिवाळीप्रसंगी लाँच करतात.

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: भारतात सणासुदीचा काळ (Festive Season offers) म्हणजे शॉपिंग आणि ऑफर्सचा सीझन! कपडे, घरातील वस्तू, अगदी घरं, बाईक्स, कार्स यांची खरेदी या काळात मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक कंपन्या, बँका, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स (Offers on e-commerce platform) देखील विविध ऑफर्स घेऊन येतात. दरम्यान सणासुदीच्या काळात एखादी मोठी गोष्ट खरेदी करणं भारतात शुभ देखील मानलं जातं. या काळात वाहन खरेदीला विशेष पसंती दिली जाते. तुम्ही देखील बाईक खरेदीचा विचार करत असाल तर आता लगेच एखादी बाईक खरेदी न करता काही दिवस थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. भारतात प्रसिद्ध असणारी रॉयल एनफील्ड (Royal Enfield New Bike Launch) कंपनी त्यांच्या नवीन बाईक्स दिवाळीप्रसंगी लाँच करतात. कंपनी काही महिन्यात नवीन बाईक्स लाँच करू शकते. जाणून घ्या या बाईक्सविषयी..

स्क्रॅम 411 - ही बाईक कंपनीने आधी लाँच केलेल्या रॉयल एनफील्ड हिमालयनचे अपडेटेड व्हर्जन आहे. ही बाईक यापूर्वी चाचणी दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाली आहे. या बाईकचे बाह्य डिझाइन आधीच लीक झाले आहे. आता अहवालानुसार, कंपनी पुढील काही आठवड्यांत ही बाईक लाँच करू शकते. कंपनीने या बाईकच्या इंजिन किंवा चेसिसमध्ये कोणताही बदल केलेला नाही पण कंपनीने यात व्हील्स अपडेट केली आहेत.

हे वाचा-Fake Mobile App मुळे तुमच्या बँक अकाउंटला धोका, असं तपासा App खरं की खोटं?

650 ट्विन्स अॅनिव्हर्सरी एडिशन-चेन्नईतील ही ऑटोमेकर कंपनीने 120वा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यामुळे कंपनी या प्रसंगी काही विशेष आवृत्ती लाँच करेल अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, कंपनी आपल्या रॉयल फील्ड इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 मोटारसायकलचे विशेष पेंट स्कीम मॉडेल बाजारात आणू शकते. या मॉडेल्सची किंमत सध्याच्या मॉडेल्सपेक्षा जास्त असू शकते.

हे वाचा-केवळ 101 रुपयांत खरेदी करू शकता Vivo चे हे प्रीमियम स्मार्टफोन, पाहा काय आहे ऑफर

क्रूझर ६५० (शॉटगन) -कंपनीद्वारे 650 cc ट्विन पॅरेलल क्रूझर चाचणी दरम्यान अनेक वेळा सार्वजनिकपणे दाखवण्यात आली आहे. अगदी अलीकडेच, कंपनीने शॉटगन नेमप्लेटची नोंदणी केली होती, ज्यामुळे असे सूचित केले जात आहे की याचे नाव शॉटगन असू शकते. एकदा लाँच झाल्यावर ही बाईक Vulcan S शी स्पर्धा करेल.

First published: