आपला सेल वाढवण्यासाठी आणि नवी कार घेणास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी ऑक्टोबर महिन्यात 53500 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.
नवरात्रीच्या शुभदिवसापासून ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ग्राहक सर्व अधिकृत डिलरशिपमधून होंडा कार खरेदी करताना आकर्षक ऑफरचा फायदा घेऊ शकतात, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
जपानी कार कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी विशेष ऑफर या कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस, एक्सचेंज ऑफर, अॅक्सेसरिज अशा रुपात असतील.
कंपनी 5th जनरेशन Honda City वर 53,500 रुपये, तर 4th जनरेशन Honda City वर 22000 रुपये डिस्काउंट ऑफर करत आहे.