नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुति सुझुकीने मोठा निर्णय घेतला आहे. Maruti Suzuki ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला असा विश्वास आहे की येत्या काही वर्षात येणाऱ्या उत्सर्जन नियमांच्या पुढील टप्प्यांमुळे डिझेल वाहनांच्या किंमतीत वाढ होईल. ज्यामुळे त्यांच्या बाजारपेठेतील विक्रीवर आणखी परिणाम होईल. मागील काही वर्षांपासून पेट्रोल कारमध्ये हळूहळू बदल दिसून आला आहे.
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुति सुझुकी इंडियाने डिझेल सेगमेंटमध्ये परत येण्याची शक्यता नाकारली आहे. कारण 2023 मध्ये उत्सर्जन नियमांच्या पुढील टप्प्यात अशा वाहनांची विक्री आणखी कमी होईल, असा विश्वास आहे. त्यामुळेच कंपनीने डिझेल वाहन सेगमेंटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे प्रमुख टेक अधिकारी सीव्ही रमण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की आम्ही डिझेल कार तयार करणार नाही. आम्ही आधीच सूचित केलं होतं, की याचा आधी अभ्यास करू आणि ग्राहकांची मागणी असल्यास आम्ही या सेगमेंटमध्ये परत येऊ शकतो. परंतु आम्ही आता डिझेल सेगमेंटमध्ये भाग घेणार नाही.
काय आहे कारण?
कंपनीचे प्रमुख टेक अधिकारी सीव्ही रमण यांनी सांगितलं, की 2023 मध्ये होणाऱ्या उत्सर्जन नियमांच्या पुढच्या टप्प्यात डिझेल वाहनांची विक्री कमी होईल. मागील काही वर्षात ग्राहकांचा कल पेट्रोल कार्सकडे वळला आहे. त्यामुळे येत्या काळात डिझेल सेगमेंटमध्ये उतरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मारुति सुझुकी इंडियाने कठोर BS-VI उत्सर्जन निमय लागू करुन डिझेल मॉडेल त्यांच्या पोर्टफोलिओमधून बंद केले होते. 1 एप्रिल 2020 पासून BS-VI उत्सर्जन प्रणाली लागू झाल्यामुळे आधीच देशातील अनेक वाहन निर्मात्यांनी त्यांच्या संबंधित पोर्टफोलिओचे डिझेल ट्रिम्स रद्द केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Maruti suzuki cars