वसीम अहमद, प्रतिनिधी अलीगढ, 30 मार्च : आजच्या युगात मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजच्या डिजिटल जगात, एकीकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेटने काम सोपे केले आहे. मात्र, तेच दुसरीकडे हेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजे मोबाईल सारख्या वस्तू नुकसान देखील करू शकतात. ते कसं, हे जाणून घेऊयात. आयुष्यातील अनेक कामांसोबतच मोबाईल हे मनोरंजनाचेही साधन असल्याने मोठ्यांपासून लहान मुलांना अक्षरश: मोबाईलचे व्यसन लागले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. जर तुम्ही आताच लक्ष दिले नाही तर तुमचा येणारा काळ खूप वेदनादायी असू शकतो. त्यामुळे आतापासूनच सावध राहा. मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे वापरकर्त्यांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. यासोबतच तुम्ही अनेक प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे तुम्हाला फीटह येऊ शकतात. नशेसाठी तळीराम करताय औषधीचा उपयोग, पाहा, पोलिसांनी काय केलं? मुलांना असतो जास्त धोका - उत्तरप्रदेशच्या बालरोगतज्ञ डॉ. आलोक कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, भारतात 1000 लोकांमागे 6 जणांना हा आजार आहे. त्याचा धोका मुलांमध्ये जास्त असतो. याशिवाय मोबाईलचा अतिवापर केल्याने फीट येण्याची शक्यता वाढते. काय आहे मुख्य कारण - डॉ. आलोक कुलश्रेष्ठ सांगतात की, सध्या मोबाईल फोनची स्क्रीन जास्त वेळ पाहणे, झोप न लागणे यामुळे रुग्ण वाढले आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या लोकांमध्ये वारंवार झटके येण्याची प्रकरणे दिसून आली आहेत. या रोगाचा उपचार शक्य आहे. पण यासाठी कमीत कमी तीन वर्षे औषधी घ्यावी लागेल. फिट येणे या आजाराचे मुख्य कारण तणाव आहे. या आजाराला एपिलेप्सी असेह म्हटले जाते. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा रुग्णाची शुद्ध हरपते. हा आजार बहुतेक 12 ते 18 वर्षांच्या दरम्यान होतो.
एपिलेप्सीची औषधे किमान तीन वर्षे घ्यावी लागतात. जर एखाद्या रुग्णाला जास्त फिट येत असतील तर उपचार पाच-सहा वर्षे चालू शकतात. एपिलेप्सी प्रतिबंधक इंजेक्शन्स, नोझल स्प्रेही येत आहेत. इतर आजारांप्रमाणे या आजारातही रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे लागते.