मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नशेसाठी तळीराम करताय औषधीचा उपयोग, पाहा, पोलिसांनी काय केलं?

नशेसाठी तळीराम करताय औषधीचा उपयोग, पाहा, पोलिसांनी काय केलं?

जप्त करण्यात आलेली औषधी.

जप्त करण्यात आलेली औषधी.

नशेसाठी तळीराम औषधीचा उपयोग करत असल्याचे समोर आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chapra (Chhapra), India

संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी

छपरा, 30 मार्च : बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू आहे. त्यामुळे दारूची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मात्र दारू तस्कर आता दारूबरोबरच कफ सिरपसह बंदी असलेल्या औषधांची तस्करी मोठ्या प्रमाणात करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या छपरा येथील मांझी येथून अलीकडच्या काही दिवसांत लाखो रुपयांचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त करण्यात आले आहे.

यानंतर उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले आहे. हँड स्कॅनरद्वारे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. याचदरम्यान, हँड स्कॅनरच्या मदतीने शोध मोहिमेदरम्यान, मोठे यश मिळाले आहे. दारू, बंदी असलेली औषधे पुनर्प्राप्त करण्यात खूप झाली आहे. याच्याच मदतीने बंदी असलेली खोकल्याचे औषध जप्त करण्यात आले आहे.

42 लाखांचे बंदी असलेले खोकल्याचे औषध जप्त -

उत्पादन अधीक्षक रजनीश कुमार यांनी सांगितले की, तपासादरम्यान मांझीच्या बलियाजवळ एका संशयास्पद कंटेनरमधून 42 लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित खोकल्याचे औषध जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

रेल्वे चालवायला ड्रायव्हर सीटवर बसला मानसिक रोगी; वाचा, पुढे काय घडलं?

कुणाला कळू नये म्हणून म्हणून हे औषध चीनी मातीने बनवण्यात आलेल्या सामानात लपवून ठेवले गेले होते. परंतु हँड स्कॅनर मशिनच्या माध्यमातून आतमध्ये बाटलीसदृश वस्तू असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले आणि त्यामुळे तपास केला असता आत प्रतिबंधित असलेली औषधी सापडली. ही औषधी पोलिसांनी तत्काळ जप्त केली.

त्यामुळेच जप्तीसह तस्करांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात येत आहे. मात्र, लोक आता दारूला पर्याय म्हणून बंदी असलेले कफ सिरप वापरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime news, Illegal liquor, Local18