Home /News /auto-and-tech /

Rain Driving Tips : पावसाळ्यात ड्रायव्हिंग करणं अवघड; दुर्घटना टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

Rain Driving Tips : पावसाळ्यात ड्रायव्हिंग करणं अवघड; दुर्घटना टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

पावसाळ्यात पाण्याने भरलेले रस्ते, अपघात होताच असतात. विशेषत: बाईक आणि स्कूटी ही वाहने पावसात सहज अपघाताला बळी पडतात. तुम्ही सुद्धा बाईक, स्कूटी चालवत असाल तर अशा प्रकारे तुमचा प्रवास सुरक्षित करा.

  मुंबई, 30 जून : सहसा पावसात गाडीवर फिरणे हा काही लोकांचा छंद असतो. तर काहींसाठी गरजेचा असतो. घराबाहेर पडण्याचे कारण काहीही असो. पण पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर अपघात (Accident) होण्याची शक्यता असते. विशेषत: स्कूटी किंवा बाईक सारख्या दुचाकी (Two Wheeler Riding In Rain) चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास तुम्ही पावसातही राईड सुरक्षित (Safe Riding During Rain) करू शकता. मुसळधार पावसामुळे बहुतांश शहरातील रस्त्यावर खड्डे (Wholes On Roads) पडलेले दिसत नाहीत. तर वाहतूक कोंडीही (Traffic Jam) होत असते. अशा परिस्थितीत रस्त्यावरील निसरड्यांमुळे अपघातात वाढ होत आहे. त्याचबरोबर दुचाकी वाहने चालवणारे लोक पावसात पडून जखमी (Accident In Rainy Season) होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला बाईक आणि स्कूटी चालवण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स (Tips And Tricks For Easy Riding) सांगत आहोत. ज्याचे पालन करून तुम्ही सुरक्षितपणे गाडी चालवू शकता. टायरकडे दुर्लक्ष करू नका पावसात बाईक किंवा स्कूटी नेण्यापूर्वी टायर तपासायला विसरू नका. जर तुमच्या टायरची पकड जीर्ण झाली असेल तर तुमचे वाहन रस्त्यावर सहज घसरते. त्यामुळे उशीर न करता टायर बदलून घ्या. याशिवाय टायरमधील हवा नियमितपणे तपासत राहा.

  Sunflower Seeds : सूर्यफुलाचं फक्त तेलच नव्हे तर बियाही जरूर खा; आहेत इतके आश्चर्यकारक फायदे

  पाण्यातून गाडी हळू चालवा अर्थात तुम्ही उत्तम ड्रायव्हर असालच. पण पावसाळ्यात बाईक किंवा स्कूटी हळू चालवणेच योग्य असते. त्यामुळे वाहनावर तुमचे नियंत्रण राहील आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तात्काळ ब्रेक लावून वाहन थांबवू शकता. त्याचवेळी भरधाव वेगात गाडी चालवताना अचानक ब्रेक लागल्याने गाडी घसरण्याची भीती असते. सुरक्षित अंतर राखणे पावसात तुमच्या समोर, मागे आणि पुढे जाणाऱ्या वाहनांपासून नेहमी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळी, ओव्हरलोड वाहनांपासून पुरेसे अंतर राखण्यास विसरू नका. गाडीचा हेडलाइटही चालू ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पावसात बघायला त्रास होणार नाही आणि तुमच्या आजूबाजूला धावणारी वाहनेही तुम्हाला सहज दिसतील. ब्रेकचा योग्य वापर करा पावसाळ्यात मागील ब्रेक लावणे केव्हाही चांगले. यामुळे तुमची गाडी हळूहळू थांबते. समोरचा ब्रेक लावल्याने गाडी अचानक थांबते. यामुळे तुमची गाडी तर घसरतेच पण मागून येणाऱ्या वाहनांनादेखील यामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही वाहन ताबडतोब थांबवण्यासाठी पुढचे आणि मागचे ब्रेक एकत्र लावा आणि फक्त समोरचा ब्रेक लावणे टाळा.

  Travel Tips : कॉलेज स्टुडंट आहात? मित्रमंडळींसोबत एन्जॉय करायचंय? ट्राय करा हे टुरिस्ट स्पॉट्स

  पाणी साचलेल्या रस्त्यापासून दूर राहा पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यावर जाणे टाळा. अथवा रस्त्यावरील खड्डे ना दिसल्यामुळे त्यामध्ये पडण्याची शक्यता तर असतेच. त्यासोबत बाईक किंवा स्कूटीच्या एक्झॉस्टमध्येही पाणी जाऊ शकते. त्यामुळे तुमची गाडी बंद पडू शकते. म्हणून पावसात कोरड्या रस्त्यावरूनच प्रवास करा आणि पाण्यात बुडलेल्या रस्त्यावर जाणे टाळा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, While driving

  पुढील बातम्या