Monsoon Travel : पावसाळ्यात फिरण्यासाठी 'हे' आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट द्या
मनाली (Manali) मनाली हे कॉलेज गोइंग स्टुडंट्सचे आवडते ठिकाण आहे. कॅम्पिंग, रोमांच आणि बोन फायरचा आनंद घेणार्या तरुणांसाठी मनालीच्या सहलीचे नियोजन करणे खूप संस्मरणीय ठरू शकते. येथील आकर्षण असलेल्या अटल बोगद्याला आणि सोलांग व्हॅलीला नक्की भेट द्या. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान (Ranthambore National Park) राजस्थानमध्ये असलेले रणथंबोर नॅशनल पार्क हे ग्रुपसोबत जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या नॅशनल पार्कमध्ये तुमच्या कॉलेज ग्रुपसोबत मजा केल्याने तुमची ट्रिप सर्वोत्तम होऊ शकते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या गोवा (Goa) समुद्राचे दृश्य पाहण्याची आणि समुद्रकिनाऱ्यावर मजा लुटण्याची आवड असलेल्या तरुणांसाठी गोव्याच्या सहलीचे नियोजन करणे हाही उत्तम पर्याय असू शकतो. विशेषत: नाईट लाइफ आणि पार्टीची आवड असलेल्या तरुणांसाठी गोव्यात खेळ, फिशिंग, क्रूझ पार्टी, डॉल्फिन टूर असे अनेक पर्याय आहेत. अशा परिस्थितीत गोवा हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Travel with friends