मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. सोबतच उकाडा इतका जास्त होत आहे की लोकांना नकोसं झालं आहे. देशातील काही भागात तर इतकं जास्त तापमान आहे की लोक दिवसा घराबाहेर पडणं देखील टाळतात. यासगळ्यात लोक पर्याय म्हणूम एसीचा वापर करतात एसी म्हणजेच एअर कंडिशनर घर किंवा एखादा भाग शांत ठेवण्यात मदत करतं. पण हे असं उपकरण आहे की ज्यामुळे वीजेचं बिल खूपच जास्त येतं, म्हणून अनेक लोक याला वापरताना १० वेळा विचार करतात. पण असं असलं तरी एक असा पर्याय आहे, ज्यामुळे तुम्हाला एसीचं बिल कमी येऊ शकतं, आता ते कसं शक्य आहे हे पाहू. या दिवशी चुकूनही कापू नका नख, नाहीतर घरी येऊ शकतं दारिद्र्य आपण सर्वांनी ऐकले आहे की काही एसी 3 स्टार रेटिंगसह येतात, तर काही एसी या 5 स्टार रेटिंगसह येतात. हे स्टार रेटिंग उपकरण किती ऊर्जा कार्यक्षम आहे हे दर्शवते. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) द्वारे प्रमाणित केलेले, रेटिंग एका स्टारपासून ते पाच स्टार्सर्यंत असते. एसीला दोन अटींच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाते- एक खोली थंड करण्याची त्याची क्षमता आणि ती थंडावा देण्यासाठी किती वीज लागते, यावर. त्यामुळे तुम्ही जास्त स्टारचा एसी घ्याल तितकंच कमी वीज बिल तुम्हाला येईल. 3 स्टार एसी आणि 5 स्टार एसी हे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, 5 स्टार एसी सर्वात जास्त ऊर्जा कार्यक्षम आहेत, म्हणजेच या एसीला कमी वीज लागते, ज्यामुळे बिल देखील फार कमी येतं. पण 5 स्टार एसीची किंमत फार जास्त असते. तर 1 स्टार एसी सर्वात कमी किंवा स्वस्तात मिळते, पण यासाठी ऊर्जा जास्त लागते, ज्यामुळे वीज बिल जास्त येतं. तुमचा एसी जितका जास्त ऊर्जा कार्यक्षम असेल तितकी तुम्ही तुमच्या वीज बिलात बचत करू शकता. सामान्यतः, 5 स्टार एसी तुम्हाला 3 स्टार एसीच्या तुलनेत 28% जास्त वीज वाचविण्यात मदत करेल. वीज वापराच्या बाबतीत, 0.75 टन 3 स्टार एसी अंदाजे 524 वॅट्स वापरतो, तर त्याच टन क्षमतेचा 5 स्टार एसी अंदाजे 450 वॅट्स वापरतो.
1 टन 3 स्टार एसी 747 वॅट्स वापरतो, तर 1 टन 5 स्टार एसी 554 वॅट्स वापरतो. त्याचप्रमाणे, 1.5 टन 3 स्टार एसी आणि 5 स्टार एसी अनुक्रमे 1104 आणि 8740 वॅट्स वापरतात. पैशाच्या बाबतीत, तुम्ही 1.5 टन 3 स्टार एसीच्या तुलनेत 1.5 टन 5 स्टार एसीवर वार्षिक सुमारे 3,000 रुपये वाचवू शकता.