महत्त्वाची बातमी, कारमध्ये टायर ठेवण्याबद्दल नियमात बदल

महत्त्वाची बातमी, कारमध्ये टायर ठेवण्याबद्दल नियमात बदल

भारतात वाढत चाललेली प्रदूषण पातळी आणि इंधनचे दर पाहता केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन विक्रीवर जोर दिला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जुलै : इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) केंद्र सरकारने आता मोटर वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) बदल केला आहे. कारमध्ये जर 'हवा नियंत्रण प्रणाली असेल तर अतिरिक्त टायर (स्टेपनी) ठेवण्याची गरज नाही' असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गाडीमध्ये बॅटरी ठेवण्यासाठी जास्त जागा मिळेल.

भारतात वाढत चाललेली प्रदूषण पातळी आणि इंधनचे दर पाहता केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन विक्रीवर जोर दिला जात आहे.  इलेक्ट्रिक वाहनांची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपन्यांसाठी आणखी नियम शिथिल केले जात आहे.

काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी ‘हायहोल्टेज ड्रामा’, मुख्यमंत्र्यांची राजभवनावर धडक

परंतु, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ग्राहकांना चार्जिंग आणि गाडी किती किमी धावणार याची जास्त चिंता लागलेली असते. त्यामुळे जर गाडीतच अतिरिक्त बॅटरी ठेवण्यासाठी योग्य जागा करता यावी, यासाठी हा नवीन बदल करण्यात आला आहे.

याबद्दल एक संशोधन करण्यात आले होते. त्यानुसार, अलीकडच्या कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) दिली असेल आणि टायर रिपेअर करण्याचे साहित्य दिले जात आहे. त्यामुळे जर गाडीत TPMS सुविधा असेल तर अतिरिक्त टायर ठेवण्याची आवश्यकता नाही.

सर, तुम्ही सुद्धा!मुख्याध्यापकाचा काटा काढण्यासाठी तरुणाला घेऊन दिला गावठी कट्टा

TPMS प्रणाली ही चालकाला वेळोवेळी टायर प्रेशरबद्दल चालकाला माहिती पुरवेल. तसंच कारमध्ये ही प्रणाली असल्यामुळे चालकाचा नेमकी टायरची अचूक परिस्थितीत माहिती राहिल. बऱ्याच वेळा टायर खराब झाले असेल किंवा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना वारंवार घडत असता. त्यामुळे ही प्रणाली त्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: July 24, 2020, 4:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या