Home /News /technology /

काय सांगता! सांडपाणी अन् कचऱ्यापासून कारची इंधननिर्मिती! नितीन गडकरींची माहिती

काय सांगता! सांडपाणी अन् कचऱ्यापासून कारची इंधननिर्मिती! नितीन गडकरींची माहिती

भविष्यात सांडपाणी आणि कचऱ्यापासून कारच्या इंधनाची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिलीय. नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर (Green hydrogen) चालणारी कार चालवणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. ते नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजन या परिषदेला मार्गदर्शन करत होते.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 6 डिसेंबर : जगभर पारंपरिक उर्जा स्रोतांची मागणी प्रचंड आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल (Petrol Diesel) प्रचंड महाग होत आहे. त्यामुळे अपारंपरिक उर्जा स्रोत किंवा इंधनं शोधणं काळाची गरज बनली आहे. सौर उर्जा, पवन उर्जा, बायोडिझेल हे पर्याय सहजतेने वापरता यावेत यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. त्यामुळे हायड्रोजन, सौर उर्जा आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्याही सध्या चर्चेत आहेत. इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यांवर धावताना दिसतातही. या सगळ्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपलं मत आणि व्हिजन जाहीर कार्यक्रमांत मांडत असतात. हायड्रोजनवर (Green hydrogen) चालणाऱ्या कारबद्दल त्यांनी नुकतीच माहिती दिली. नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार चालवणार असल्याचं म्हटलं आहे. ते नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजन या परिषदेला मार्गदर्शन करत होते. ग्रीन हायड्रोजनसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं.

  टेन्शन कमी होणार; आता पेट्रोल पंपावरच मिळणार Electric Vehicles चार्जिंगची सुविधा

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर (Green Hydrogen) बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून (Solid Waste) ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं गडकरी म्हणाले. ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूट, फरिदाबाद यांच्याकडून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार बनवण्यात आली असून ती मी विकत घेतली असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन (ग्रीन हायड्रोजन) चा उपयोग वाढवण्याच्या योजनांवर काम करत असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले, ‘लवकरच दिल्लीच्या रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजन फ्यूएल कार धावणार आहे. मी स्वत: तशी कार बूक केली आहे आणि लोकांचा विश्वास बसावा म्हणून मीच पहिल्यांदा ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार वापरणार आहे. केंद्र सरकार 3 हजार कोटी रुपयांचे हायड्रोजन मिशन राबवत आहे. सोलरच्या सहाय्याने सांडपाणी रिसायकल करून ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग बंद करायचा आहे. तसेच ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन बनणार आहे. यासोबतच भविष्यात हायड्रोजन निर्यात करणारा देश बनवायचा आहे.

  Electric Vehicle ने केवळ एका रुपयांत होईल 1 किलोमीटरचा प्रवास, गडकरींची माहिती

  एका परिषदेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतात ग्रीन हायड्रोजनवर बस, ट्रक आणि कार चालवण्याची माझी योजना आहे, ज्यामुळे शहरांमधील सांडपाणी आणि घनकचऱ्याचा वापर करून हायड्रोजन इंधन तयार केले जाईल. कचऱ्याचाही वापर करण्याच्या योजनेवर मी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
  First published:

  Tags: Electric vehicles, Petrol and diesel, Vehicles

  पुढील बातम्या