मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता कारसारखीच बाईकही राहणार सुरक्षित, ट्रॅक करता येणार लोकेशन!

आता कारसारखीच बाईकही राहणार सुरक्षित, ट्रॅक करता येणार लोकेशन!

तुम्हालाही तुमची मोटारसायकल (Bike) किंवा स्कूटर (Scooter) चोरीला जाण्याची भीती सतावते का? मोठमोठ्या शहरांमध्ये टू-व्हीलर चोरीच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळे लोक आपल्या बाइकवर जीपीएस सिक्युरिटी सिस्टीम (GPS) बसवण्याचा विचार करतात.

पुढे वाचा ...

    मुंबई, 16 जून : तुम्हालाही तुमची मोटारसायकल (Bike) किंवा स्कूटर (Scooter) चोरीला जाण्याची भीती सतावते का? मोठमोठ्या शहरांमध्ये टू-व्हीलर चोरीच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळे लोक आपल्या बाइकवर जीपीएस सिक्युरिटी सिस्टीम (GPS) बसवण्याचा विचार करतात. मोटारसायकलवरची जीपीएस सिस्टीम केवळ बाइकची चोरी होत असताना नोटिफिकेशन्स देत नाहीत, तर बाइकचं लोकेशनही सांगते. जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममुळे वाहनाचं नेमकं स्थान वाहनाच्या मालकाला नेमकेपणाने कळतं. तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरूनही बाईक कुठे आहे, हे तुम्हाला कळू शकतं. तुम्हीही अशीच जीपीएस सिस्टीम (GPS System) शोधताय का? मग आम्ही तुम्हाला सांगतोय ऑनलाइन उपलब्ध असलेल्या काही जीपीएस सिस्टीम्सबद्दल.

    ZAICUS ST-901 जीपीएस ट्रॅकर

    ही मोटारसायकल जीपीएस सिस्टीम सॅटेलाइट मॅपद्वारे (Satellite Map) काम करते. ही सिस्टीम वॉटरप्रूफ (Waterproof) आहे आणि त्याला 150 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. त्यात रिअल टाइम ट्रॅकर आणि ओव्हरस्पीडिंग अलर्ट अशा फीचर्सचाही समावेश आहे. अॅमेझॉनवर या सिस्टीमची किंमत 1499 रुपये आहे. रिअलटाइम ट्रॅकरमुळे वाहनाचं ताजं लोकेशन सतत अपडेट होत राहतं. तसंच, गाडी प्रमाणापेक्षा जास्त वेगाने चालवली जात असेल, तर त्याची माहिती ओव्हरस्पीडिंग अलर्टमुळे कळते.

    Drivool 890-IN जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस

    ही जीपीएस सिस्टीम चांगल्या पद्धतीने लोकेशन ट्रेसिंग करण्यासाठी 3 सॅटेलाइट व्ह्यू दर्शवते. ही सिस्टीमही वॉटरप्रूफ असून, ती इन्स्टॉल करणं सोपं आहे. या डिव्हाइसमध्ये मल्टियुझर ऑप्शन, मल्टि व्हेइकल ट्रॅकिंग आणि डॅशबोर्ड रिपोर्टिंग अशी फीचर्स आहेत. अॅमेझॉनवर या डिव्हाइसची किंमत 1699 रुपये आहे.

    Onelap Micro-हिडन जीपीएस ट्रॅकर

    हे डिव्हाइस कनेक्टिंग वायर्स, 12 महिन्यांचा सिम कार्ड डेटा, अँड्रॉइड आणि आयओएस अॅपसह येतं. टू-व्हीलर चोरी झाली तर युझर आपल्या बाइकचं लोकेशन या अॅपमध्ये ट्रॅक करू शकतात. हे डिवाइस IPx5 वॉटरप्रूफ रेटिंगसह येतं. हे जीपीएस डिव्हाइस युझरला अॅमेझॉनवरून 3220 रुपयांना खरेदी करता येईल.

    Akari Gt02A जीपीएस ट्रॅकर डिव्हाइस

    हे डिव्हाइस हाय-परफॉर्मन्स दर्शविणारं आहे. त्याच्या साह्याने फोन किंवा लॅपटॉपद्वारे आपलं वाहन ट्रॅक करता येऊ शकतं. 29.4x12.4x7.6 सेंटीमीटर असा त्याचा आकार आहे. डिव्हाइसचं वजन 610 ग्रॅम आहे. अॅमेझॉनवर (Amazon) या डिव्हाइसची किंमत 1499 रुपये आहे.

    First published:

    Tags: Bike riding, Car