• Home
  • »
  • News
  • »
  • auto-and-tech
  • »
  • Bounce Infinity इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चिंगसाठी सज्ज; रिमुव्हेबल बॅटरीमुळे चार्जिंगचं टेन्शन कमी होणार

Bounce Infinity इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चिंगसाठी सज्ज; रिमुव्हेबल बॅटरीमुळे चार्जिंगचं टेन्शन कमी होणार

बाऊंन्स इन्फिनीटीमध्ये उत्तम आणि काढता येणारी ली-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे गाडीतून बॅटरी काढून घेऊन तीचे चार्जिंग (Bounce Infinity electric scooter with removable battery) करू शकतात.

  • Share this:
    मुंबई, 16 नोव्हेंबर : भारतातील पहिली स्मार्ट मोबिलीटी सोल्यूशन कंपनी असलेली बाऊंन्स आता बाऊंन्स इन्फिनीटी (Bounce Infinity) ही आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Electeric Scooter) सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही अॅडव्हान्स ‘मेड इन इंडिया’ स्कूटर सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि उत्तम फीचर्ससह येत आहे. बाऊंन्स इन्फिनीटी साठीची प्री बुकिंग (Pre Booking for Bounce Infinity Scooter) लवकरच सुरु होणार असून जानेवारी 2022 पर्यंत या गाड्यांची डिलिव्हरी सुरु होण्याची अपेक्षा आहे. बाऊंन्स इन्फिनीटीमध्ये उत्तम आणि काढता येणारी ली-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे गाडीतून बॅटरी काढून घेऊन तीचे चार्जिंग (Bounce Infinity electric scooter with removable battery) करू शकतात. या जोडीला, बाऊंन्स तर्फे वैशिष्ट्यपूर्ण ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ हा पर्यायही देण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत हे प्रथमच होत आहे. यामध्ये ग्राहकांना एकदम वाजवी किंमतीत बॅटरी शिवाय बाऊंन्स इन्फिनीटी खरेदी करण्याचा आणि बाऊंन्स बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क त्याऐवजी वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहकांनी बॅटरी स्वॅप्ससाठी पैसे भरले की बाऊंन्स स्वॅपिंग नेटवर्कमधून रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात संपूर्णपणे चार्ज झालेली बॅटरी ते घेऊ शकणार. यामुळे पारंपरिक स्कूटर्सच्या तुलनेत या स्कूटरची प्रवाही किंमत 40 टक्क्यापर्यंत खाली उतरते. आता Samsung कंपनी बनवणार Foldable स्मार्टफोन; पाहा फीचर्स इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत 40 ते 50 टक्क्यांपर्यतची किंमत ही बॅटरीचीच असते. बॅटरीची किंमत वजा जाता इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत ग्राहकांच्या खिशाला परवडणारी आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीला चालना मिळेल. या जोडीलाच, बाऊंन्स वेगाने व्यापक पातळीवर बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क उभारत आहे. त्यामुळे किरकोळ ग्राहक आणि त्यांच्या यशस्वी राईड शेअरिंग व्यवसायालाही मदत होईल. Smartphone वर भारतीय रोज घालवतात इतका वेळ! App डाउनलोड करण्यााचा टक्काही वाढला बाऊंन्सने 2021 मध्ये 22 मोटर्समध्ये 100 टक्के वाटा मिळवला असून या कराराचे मूल्य 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. 22 मोटर्सशी झालेल्या कराराचा भाग म्हणून बाऊंन्सने राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन केंद्र यांच्यावर ताबा मिळवला आहे. या अत्याधुनिक केंद्राची दरवर्षी 1,80,000 स्कूटर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे. भारतीय बाजारपेठेची क्षमता लक्षात घेऊन, कंपनी दक्षिण भारतात आणखी एक उत्पादन केंद्र उभारण्याची योजना आखत आहे. पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर गुंतवण्यासाठी बाऊंन्सने बाजूला ठेवले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published: