नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : जर्मनीतील लग्जरी कार निर्माता कंपनी BMW Motorrad India आपल्या नव्या स्कूटरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी Motorrad India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर BMW Maxi-Scooter चा एक टीजर जारी केला होता. आता 12 ऑक्टोबर रोजी कंपनी BMW maxi scooter C400GT भारतात लाँच करणार आहे. कंपनीने अधिकृत अकाउंटवर स्कूटरचा टीजर शेअर करत याबाबत माहिती दिली. ही भारतातील सर्वात प्रीमियम ग्रेड स्कूटर ठरू शकते. BMW स्कूटर त्याच्या किंमतीमुळेही सध्या चर्चेत आहे. काय असेल किंमत - BMW Maxi-Scooter 12 ऑक्टोबर रोजी लाँच झाल्यानंतर याची विक्री सुरू केली जाईल. याची एक्स शोरुम किंमत जवळपास 5 लाख रुपये असेल. तर कंपनीने 1 लाख रुपयांत प्री बुकिंग सुरू केलं आहे. भारतात या स्कूटरहून अतिशय कमी किंमतीत अनेक प्रकारच्या, विविध फीचर्स असलेल्या स्कूटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या महागड्या स्कूटरला आता भारतीय बाजारामध्ये किती प्रतिसाद मिळतो, हे लाँचनंतर समजू शकेल.
दिवाळीत टूव्हीलर घेण्याचा विचार आहे? वाचा Royal Enfieldच्या प्रीमियम बाईक्सविषयी
BMW Maxi-Scooter स्पेसिफिकेशन्स - या स्कूटरमध्ये 350 cc चं इंजिन मिळेल, जे सिंगल सिलेंडर आणि लिक्विड कूल्ड इंजिन असेल. BMW maxi scooter C400GT रिवाइज्ड ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोलला स्कूटरशी जोडण्यात आलं आहे. BMW स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 139 किमी असल्याची माहिती आहे.
We know you have been waiting with bated breath for a bit, but your wait is coming to an end very soon.
— BMWMotorrad_IN (@BMWMotorrad_IN) October 6, 2021
Unveiling on October 12, 2021.#C400GT #CityMeetsGT #UrbanMobility #MakeLifeARide #BMWMotorradIndia #BMWMotorrad pic.twitter.com/GWq87txBJP
या स्कूटरमध्ये त्याच्या ब्रेकवर काम करण्यात आलं आहे, ज्यामुळे चालक आरामदायी राइडचा अनुभव घेऊ शकेल. त्याशिवाय स्कूटरच्या CVT गियरबॉक्सलाही अपडेट करण्यात आलं आहे. आता उद्या 12 ऑक्टोबरला ही स्कूटर लाँच झाल्यानंतर भारतीय मार्केटमध्ये याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.