मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /VIDEO : Tata Punch ची डिलीव्हरी घेताना घडली मोठी चूक; नवी कार झाली खटारा!

VIDEO : Tata Punch ची डिलीव्हरी घेताना घडली मोठी चूक; नवी कार झाली खटारा!

आपल्या कारची डिलीव्हरी घेताना लोक खूप उत्साही असतात. मात्र त्या व्यक्तीसोबत असं काही घडलं की...

आपल्या कारची डिलीव्हरी घेताना लोक खूप उत्साही असतात. मात्र त्या व्यक्तीसोबत असं काही घडलं की...

आपल्या कारची डिलीव्हरी घेताना लोक खूप उत्साही असतात. मात्र त्या व्यक्तीसोबत असं काही घडलं की...

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : हातात नव्या कारची किल्ली आली तर कोणालाही आनंद होईल. आपल्या कारची डिलीव्हरी (Car delivery) घेताना लोक इतके उत्साही असतात की, अनेकदा यातून काहीतरी अनपेक्षित घडतं. असाच एक किस्सा सध्या इंटरनेटवर व्हायरल (Viral On Internet) झाला आहे. तुम्हाला माहितीच असेल टाटा पंचने (TATA Punch) नुकतच मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. पंच एक छोटी, कॉम्पॅक्ट आणि काही प्रमाणात ऑफ-रोडिंग कार आहे. जिला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5- स्टार रेटिंग मिळाली आहे. मात्र ही कहाणी पंचच्या डिलीव्हरी संबंधित आहे. (Big mistake made while delivering Tata Punch The new car is a mess)

डिलीवरी दरम्यान काय घडलं?

एका शोरूममधून पंच मायक्रो एसयूवीची डिलीवरी घेताना कारच्या एका नव्या मालकाचं आपल्या गाडीवरील नियंत्रण गेलं, आणि गाडी समोरील भिंतीला धडकली. YouTube वर एका यूजरने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्याच्या सुरुवातीला कार मालक ड्रायव्हरच्या सीटवर आहे आणि कर्मचारी हँडओव्हर फोटो घेण्यासाठी आजूबाजूला दिसत आहेत.

" isDesktop="true" id="625652" >

शोरूमच्या स्टाफमधील एक व्यक्ती कारबद्दल माहिती देताना दिसत आहे. ज्या दरम्यान कार रँपपासून काही अंतरावर पुढे जाते. त्यावेळी काही फूट खोल असल्यामुळे चालक गाडीला सांभाळतो. मात्र काही वेळानंतर कार चुकीच्या पद्धतीने पुढे केली जाते.त्याने कार बाहेर काढण्यासाठी डाव्या बाजूला स्वीप केलं, मात्र बाहेर काढण्याऐवजी तो उजव्या बाजूला वळला आणि एका भिंतीला धडकला.

हे ही वाचा-अनेक परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो Car Insurance,विमा काढताना या गोष्टी लक्षात ठेवा

का होते अशी घटना..

ड्रायवरला एएमटी कारविषयी माहिती नव्हतं. तेथील स्टाफ त्याला समजवत होता की, पंच मायक्रो एसयूवीला ड्राइव मोडवर कसं ठेवलं जातं. मात्र नव्या ड्रायव्हरला याबद्दल माहिती नव्हतं. त्यामुळे त्याच्यासोबत हा अपघात घडला.

First published:

Tags: Car crash, Tata group, Video viral