Home /News /auto-and-tech /

मोबाइल चार्ज कधी व कसा करावा? जाणून घ्या 4 महत्त्वाच्या टिप्स

मोबाइल चार्ज कधी व कसा करावा? जाणून घ्या 4 महत्त्वाच्या टिप्स

मोबाइलची बॅटरी अधिक काळ चांगली राहावी, म्हणून काय करू शकता..? वाचा सविस्तर

  नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : आपण जर अत्यंत सुज्ञपणे मोबाईलचा (Mobile) वापर केला तर मोबाईलमधील बॅटरीचे (Battery) आयुष्य नक्कीच वाढण्यास मदत होते. पण तुम्ही बॅटरी रिचार्ज (Battery Recharge) कशा पध्दतीने आणि किती वेळा करता, यावर देखील बॅटरीचे लाईफ अवलंबून आहे. योग्य वापरातूनच तुम्ही बॅटरीचे नुकसान टाळू शकता. सध्याच्या लिथियम-आयन (Lithium - ion) बॅटरीज सरासरी 500 ते 1000 वेळा रिचार्ज करण्यास सपोर्ट करतात. बॅटरीचे लाईफ (Battery Life) वाढवण्यासाठी जी महत्वाची 4 सुत्रं आहेत, ती जाणून घेऊयात.
  सर्वसामान्यपणे प्रत्येकवेळी मोबाईलची बॅटरी 100 टक्के चार्जिंग करण्याऐवजी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करावी. तसेच चार्जिंगपूर्वी बॅटरी अधिक लो झालेली नाही ना याची खात्री करावी. बॅटरी लेव्हल 30 टक्क्यांपर्यंत येताच ती तातडीने चार्जिंगला लावावी. रिचार्ज करण्यासाठी बॅटरी 5 टक्क्यांपर्यंत कमी होईस्तोवर प्रतिक्षा करणे कदापि योग्य नाही. जेव्हा मोबाईलचा डिस्प्ले अधिक काळ सुरु राहत नाही, तेव्हाच 0 टक्के 100 टक्के चार्जिंग सायकल (Charging Cycle) पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. (उदा. जेव्हा डिस्प्ले बंद होण्यापूर्वी 20 किंवा 30 टक्केच बॅटरी शिल्लक असल्याचे दर्शवले जाते)  पूर्ण चार्जिंगचे चक्र मोबाईलला विश्रांती देण्याचे कार्य करते. (हे वाचा-मुंबईकरांचं तिच्यावर हे अस्सं प्रेम आणि श्रद्धा आहे! लाइफलाइन 10 महिन्यांनी सुरू)
  रात्रभर मोबाईल चार्जिंग करणे टाळा जेव्हा बॅटरी 100 टक्के चार्ज होते, तेव्हा मोबाईल पार्टसचे नुकसान टाळण्यासाठी आपण स्मार्टफोन तातडीने अनप्लग करणे आवश्यक आहे. रात्री झोपायला जाण्यापूर्वी चार्जिंगला लावलेला फोन सकाळी पूर्ण चार्ज झाल्यावरच अनप्लग केला जातो, हे अगदी चुकीचे असून, असं कोणीही सांगण्यात आलेलं नाही. आता बहुतांश स्मार्टफोनमध्ये बॅटरी फुल चार्ज आहे, असे दर्शवले जाते, त्यामुळे अशा सवयी टाळणे महत्वाचे आहे. स्मार्टफोन प्रमाणापेक्षा गरम होत असेल तर लक्ष द्या सर्वसाधारणपणे, स्मार्टफोन चार्जिंग होत असताना त्याचे तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नसावे. चार्जिंग सुरु असताना मोबाईल वापरणे हे योग्य असले तरी त्याचा अनावश्यक वापर टाळावा. चार्जिंग सुरु असताना फोनचा अनावश्यक वापर (जसे की गेम्स खेळणे) केल्यास तो प्रमाणापेक्षा अधिक गरम होतो. तसेच जेव्हा तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगला लावता, तेव्हा त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश किंवा तीव्र सूर्य किरणं येत नाहीत ना हे पाहणं देखील आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा जास्त वेळ चार्जिंग केल्याने आणि मोबाईल अधिक गरम झाल्याने बॅटरीवर विपरित परिणाम होऊन तिचा लाईफस्पॅन (Lifespan) कमी होतो.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Phone battery, Smartphone, Tech news, Technology

  पुढील बातम्या