Home /News /mumbai /

मुंबईकरांचं तिच्यावर हे अस्सं प्रेम आणि श्रद्धा आहे! लाइफलाइन 10 महिन्यांनी सुरू झाली त्या दिवशीचा किस्सा VIRAL

मुंबईकरांचं तिच्यावर हे अस्सं प्रेम आणि श्रद्धा आहे! लाइफलाइन 10 महिन्यांनी सुरू झाली त्या दिवशीचा किस्सा VIRAL

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai lifeline) आहे. 10 महिन्यानंतर तिच्याबरोबर प्रवास करायला, खिडकीतून झोकात वारा खायला मिळाल्यावर हे असं नतमस्तक व्हावं वाटणारच... काय म्हणता?

    मुंबई, 3 जानेवारी : कोरोनाच्या साथीमुळे (corona pandemic) सर्वसामान्यांच्या (common people) जीवनावर खूपच परिणाम झालेला आहे. यावेळी मुंबईची लाइफलाईन म्हणजेच लोकल ट्रेनदेखील गेले वर्षभर सामान्यांसाठी बंद होत्या. केवळ अत्यावश्यक कर्मचारी आणि महिलांसाठी लोकल सेवा सुरू होत्या. सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न मागच्या 8-9 महिन्यात अनेकदा विचारला गेला. पण आता दहा महिन्यानंतर मुंबईतील सर्वसामान्य लोकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) एक फोटो खुप जास्त प्रमाणात व्हायरल (viral) झाला आहे. मुंबई लोकल (Mumbai local) सेवा सुरु झाल्यानंतर लोक किती आनंदी आहेत याचा अंदाज या फोटोवरून (photo) लावला जाऊ शकतो.. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पाहून लोक खुप भावूक झाले आहेत. या फोटोमध्ये एका माणसानं ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी ट्रेनच्या दारावर डोकं (head) टेकवलं आहे(bows). मुंबईकर या दिवसाची किती उत्सुकतेने वाट पाहत होते हे या फोटोवरून स्पष्ट होते. सोशल मीडियावर हा फोटो पाहून लोक भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. मुंबईकरांच्या आयुष्यात मुंबई लोकल किती महत्त्वाची आहे याचा हा फोटो पुरावा आहे. लॉकडाऊन (lock down) होण्याआधी सुमारे 80 लाख लोक दररोज लोकल ट्रेनने प्रवास करायचे. परंतू सरकारने लोकांचे होणारे हाल पाहता टप्प्याटप्प्याने लोकल ट्रेन सुरू केल्या. आता सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळल्याने अनेक निर्बंध लादले गेले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona virus in india, Mumbai local, Social media viral

    पुढील बातम्या