जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Auto News: कारचं मायलेज वाढवायचंय? या 5 गोष्टी करु नका इग्नोर, कमी खर्चात जास्त चालेल गाडी

Auto News: कारचं मायलेज वाढवायचंय? या 5 गोष्टी करु नका इग्नोर, कमी खर्चात जास्त चालेल गाडी

असं वाढवता येईल कारचं मायलेज

असं वाढवता येईल कारचं मायलेज

Ways to improve Car mileage: कारचं मायलेज वाढवण्यासाठी काही सोप्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं. अनेकदा निष्काळजीपणा तर कधी घाईघाईत लोक याकडे लक्ष द्यायचं विसरातात. ज्यामुळे मायलेज कमी होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जून : कारचं मायलेज चांगलं असावं असं चांगलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी लोक अनेक प्रयत्न देखील करतात. मात्र तरीही योग्य रिझल्ट मिळत नाही. कारण बरेच लोक निष्काळजीपणामुळे किंवा घाईघाईत काही गोष्टी इग्नोर करतात. याच कारणामुळे कारचं मायलेज खराब होतं किंवा कमी होतं. खरंतं कार चं मायलेज पूर्णपणे इंजीनच्या परफॉर्मंसवर अवलंबून असतं. इंजीनचा परफॉर्मेंस चांगला असेल तर कार अनेकदा तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मायलेज देखील देते.

News18लोकमत
News18लोकमत

दुसरीकडे, जर इंजिनवर कोणत्याही प्रकारचा लोड येत असेल आणि त्यामुळे जास्त पॉवर जनरेट करावी लागत असेल. तर कारचे मायलेज खूपच कमी होते. आम्ही तुम्हाला 5 सोप्या गोष्टी सांगत आहोत, ज्या लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या कारचे मायलेज वाढेल यासोबतच इंजिनचे आयुष्यही सुधारेल. वेळेवर सर्व्हिसिंग कारची वेळेवर सर्व्हिसिंग होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व्हिस दरम्यान इंजिन ऑइल, फिल्टर यासारख्या गोष्टी बदलल्या जातात. यामुळे गाडीचे इंजिन सुरळीत चालते आणि त्यावर कोणताही भार पडत नाही. त्याच वेळी, सस्पेन्शन किंवा ब्रेक फेल्युअर सारख्या इतर अनेक समस्या देखील मायलेजवर परिणाम करतात. योग्य वेळी सर्व्हिसिंग केल्यास या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतात. Car Care Tips: पावसाळ्यात ‘या’ 5 पद्धतींनी स्वच्छ ठेवू शकता कारची विंडस्क्रीन, ड्रायव्हिंग होईल सोपी! ओव्हरलोडिंग कारमध्ये जास्त लोक किंवा वजन वाढवू नका. तुमची कार 5 सीटर असेल आणि तुम्ही 7 लोक बसाल तर कारच्या इंजिनवर खूप भार पडेल. यामुळे कारचं मायलेज खूपच कमी होईल. दुसरीकडे, काही लोक नेहमी कारच्या बूटमध्ये काही अनावश्यक वस्तू ठेवतात. अशा वेळी कारच्या मागील बाजूस खूप वजन पडतं आणि कार खेचण्यासाठी इंजिनला अधिक जोर लावावा लागतो. अशा वेळी, इंधनाचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. एयर प्रेशर कारच्या टायरमधील हवेचा प्रेशर योग्य असेल तर इंजिनवर कमी लोड होईल. याचे कारण कारच्या टायरचे घर्षण कमी होईल. यामुळे उत्तम मायलेज तर मिळेलच पण गाडीच्या टायरची लाइफही वाढेल. कार चालवताना ‘या’ 3 चूका हमखास करतात चालक, ज्या ठरु शकतात धोकादायक ओपन विंडो ड्रायव्हिंग कारच्या खिडक्या उघड्या ठेवून कधीही गाडी चालवू नका. जर तुम्हाला खिडकी उघडी ठेवून गाडी चालवायची असेल तर ती डायगनली उघडा. उदाहरणार्थ, जर ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी उघडली असेल, तर डावीकडील मागील सीटवरील दुसरी विंडो उघडा. असे केल्याने कारमध्ये हवेचा दाब निर्माण होणार नाही आणि इंजिनवर कोणताही भार पडणार नाही. अशा वेळी कारचे मायलेज अधिक चांगले असेल. योग्य फ्यूल नेहमीच गुणवत्तेची गॅरंटी असलेल्या ठिकाणावरुन पेट्रोल किंवा डिझेल भरून घ्या. कारण खराब इंधन टाकल्यास मायलेज कमी होईल. यामुळे तुमच्या कारचे इंजिन, डिझेल-पेट्रोल फिल्टर, इंधन पंप देखील खराब होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car , Tech news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात