तुमच्या कारच्या डॅशबोर्डवर विंडस्क्रीनजवळ एसी व्हेंट्स का आहेत याचा कधी विचार केला आहे? खरंतर, कारमध्ये विंडशील्ड डिमिस्टर मोड किंवा क्लायमेट कंट्रोल सिस्टमचं स्विच असतं. हे स्विच ऑन केल्याने विंडस्क्रीनवर एसी वेंटच्या माध्यमातून हवा जाते. ज्यामुळे विंडस्क्रीनवर फॉग जमा होत नाही.
आता साधारणपणे कोणत्याही काचेच्या पृष्ठभागावर ओलावा असतानाच धुके साचते. बाहेरील तापमान आणि आतील तापमान अॅडजस्ट करण्यासाठी, एसीचे तापमान आतून सुमारे दोन अंशांनी कमी केले जाऊ शकते. जर बाहेरचे तापमान 22 अंश दाखवत असेल तर आतील तापमान खूप कमी किंवा जास्त ठेवण्याऐवजी ते 20 अंशांवर सेट करा आणि ते काम करेल.
तंबाखूचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. हे नक्कीच टाळले पाहिजे. मात्र, ते डीफॉगिंगमध्ये मदत करू शकते. जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे भरपूर आर्द्रता असेल आणि तुमच्या जागी मुसळधार पाऊस पडत असेल, तर तंबाखू घ्या आणि विंडस्क्रीनवर नीट घासून घ्या आणि नंतर सुमारे पाच मिनिटे कोरडे होऊ द्या.
पावसात कार वायपर ब्लेड चांगले असणे खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये पुरेशी स्लाइड आणि घर्षण असावे आणि रबरचा भाग खराब होऊ नये. हे फक्त पावसाळ्यातच मदत करत नाही तर ज्यावेळी तुमची विंडस्क्रीन धुसर होते तेव्हाही तुमच्या कामी येतील.
डोर व्हायजर विंडो लाइनच्या वरच्या फ्रेमच्या जवळ लावलेला तुम्ही पाहिला असेल. हे केवळ सजावटीसाठी वापरले जात नाहीत तर ते खूप उपयुक्त आहेत. हे केबिनमध्ये येणारे पाणी थांबवतात. तसेच, केबिनमध्ये एकसमान तापमान राखण्यात मदत करते.