नवी दिल्ली, 23 डिसेंबर : ‘अॅपल आयफोन’ हे उत्तम लूक आणि पॉवरफुल फीचर्समुळे नेहमीच अनेकांची पसंती राहिले आहेत. अॅपल कंपनीने या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2022 मध्ये ‘आयफोन 14’ सीरिज लाँच केली. यातील ‘आयफोन 14 प्रो’ मॉडेल आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय झालं आहे. पण अद्याप ‘आयफोन 14’ च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, आणि या फोनची किंमत जास्त असल्यामुळे अनेकांना तो विकत घेता येऊ शकला नाही. मात्र, ज्यांची हा फोन घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन वरून 56,600 रुपयांना खरेदी करता येईल.
असा मिळेल डिस्काउंट
‘आयफोन 14’ची सध्याची किंमत 79,900 रुपये आहे. पण अॅमेझॉनवर उपलब्ध ऑफरच्या मदतीनं तो 56,600 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनच्या किंमतीवर अॅमेझॉनवर 2000 रुपयांची सूट आहे. याशिवाय, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल, ज्यामुळे फोनची किंमत 72,900 रुपयांपर्यंत खाली येईल.
हे ही वाचा : Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत?
एक्सचेंज ऑफर
अॅमेझॉनवर सर्व फोनसाठी एक्सचेंज ऑफर चालू आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना हँडसेट एक्सचेंज करून जास्तीतजास्त 16,300 रुपयांची सूट मिळवू शकता. ‘आयफोन 14’ची खरेदी करताना तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये 16,300 रुपयांची सूट मिळाली, तर तुम्हाला हा फोन 56,600 रुपयांना मिळेल. मात्र, एक्सचेंज ऑफरवरील सूट ही तुमच्या जुन्या हँडसेटच्या स्थितीनुसार असेल, हे लक्षात ठेवा.
असे आहेत ‘आयफोन 14’चे स्पेसिफिकेशन्स
‘आयफोन 14’ मध्ये 14 FHD+ रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. यात 1200 निट्सचे पीक ब्राइटनेस आणि अॅपलचे सेरामिक शील्ड ग्लास प्रोटेक्शन आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सल लेन्स आणि 120 डिग्री व्ह्युईंग अँगलसह 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल कॅमेरा सिस्टिम आहे. फोनचा रिअर कॅमेरा 4K 60fps वर व्हिडिओ शूट करू शकतो. तर फ्रंटला 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.
हे ही वाचा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय
हे डिव्हाइस अॅपलच्या A15 बायोनिक चिपसेटद्वारे संचलित आहे. यामध्ये 5-कोर GPU आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये 3,279mAh बॅटरी आहे आणि लेटेस्ट आयओएस 16 ने हा फोन सुसज्ज आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं या फोनमध्ये फेस आयडी सपोर्ट देण्यात आलाय. मोठ्या डिस्काउंटमध्ये हा फोन अॅमेझॉनवर खरेदी करता येणार असून ज्यांना आयफोन घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Apple, Iphone, Smart phone