मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत?

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत?

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत?

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत?

मोबाइल घेऊ इच्छिणाऱ्या शाओमी कंपनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Xiaomi ने ग्राहकांसाठी आपली Xiaomi 13 सीरीज लाँच केली आहे. या लेटेस्ट सीरिजअंतर्गत Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा सर्वांत मजबूत प्रोसेसर देण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 12 डिसेंबर: मोबाइल घेऊ इच्छिणाऱ्या शाओमी कंपनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Xiaomi ने ग्राहकांसाठी आपली Xiaomi 13 सीरीज लाँच केली आहे. या लेटेस्ट सीरिजअंतर्गत Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा सर्वांत मजबूत प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच या डिव्हाइसमध्ये 120 वॉट सुपर फास्ट चार्जिंग स्पीडसारखी वैशिष्ट्यं आहेत. Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोनच्‍या किमती आणि या हँडसेटमध्‍ये दिलेल्‍या फीचर्सबद्दल जाणून घेऊ या.

  Xiaomi 13 स्पेसिफिकेशन्स-

  डिस्प्ले : Xiaomi 13 मध्ये 6.36 इंच फुल-एचडी प्लस रिझोल्युशन डिस्प्ले आहे. फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट, 1900 nits पीक ब्राइटनेस आणि 240 Hz टच सॅम्पलिंग रेटसारखी फीचर्स मिळतील.

  कॅमेरा : शाओमी 13मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX800 कॅमेरा आहे. तसंच 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 10-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

  बॅटरी क्षमता : या डिव्हाइसमध्ये 67W फास्ट चार्ज सपोर्टसह 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनला 50W वायरलेस चार्जिंगसह 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल.

  हेही वाचा: फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

  Xiaomi 13 Pro स्पेसिफिकेशन्स-

  डिस्प्ले : शाओमी 13 Pro मध्ये 6.73 इंच LTPO डिस्प्ले आहे. तो क्वाड एचडी प्लस रिझोल्युशन ऑफर करतो. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस वापरण्यात आली आहे. 1900 nits पीक ब्राइटनेस व्यतिरिक्त फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि 240 Hz टच सॅम्पलिंग रेटसारखी फीचर्स उपलब्ध असतील.

  कॅमेरा सेटअप : Xiaomi 13 Pro च्या बॅक पॅनेलवर 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50 मेगापिक्सेलच्या Sony IMX989 कॅमेरा सेन्सरसह 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

  बॅटरी : प्रो मॉडेलमध्ये 120W फास्ट चार्जसह 4820 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

  कॉमन फीचर्स

  प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेट वापरले गेले आहेत. तसंच ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 740 GPU आहे. दोन्ही डिव्हाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे.

  सॉफ्टवेअर : शाओमी 13 सीरिजअंतर्गत लाँच केलेली दोन्ही फ्लॅगशिप मॉडेल्स Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतात.

  शाओमी 13 किंमत : या डिव्हाइसचे चार प्रकार लाँच करण्यात आले आहेत. 8 GB RAM / 128 GB स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत RMB 3999 (सुमारे 47,400 रुपये) आहे. 8 GB RAM / 256 GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत RMB 4299 (सुमारे 51,000 रुपये) आहे. 12 GB RAM / 256 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत RMB 4599 (सुमारे 54,500 रुपये) आहे. टॉप व्हॅरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 512 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, या व्हॅरिएंटची किंमत RMB 4999 (सुमारे 59,500 रुपये) आहे.

  Xiaomi 13 Pro किंमत : या हँडसेटचे चार व्हॅरिएंट लाँच करण्यात आले आहेत. 8 GB RAM / 128 GB व्हॅरिएंटची किंमत RMB 4999 (सुमारे 59,500 रुपये) आहे. 8 GB RAM / 256 GB व्हॅरिएंटची किंमत RMB 5399 (सुमारे 64,000 रुपये) आहे. 12 GB RAM / 256 GB स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत RMB 5799 (सुमारे 68,700 रुपये), तर 12 GB RAM / 512 GB असलेल्या टॉप व्हॅरिएंटसाठी RMB 6299 (सुमारे 74,500 रुपये) खर्च करावे लागतील. हे फोन भारतात कधी लाँच केले जातील, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

  First published:

  Tags: Smartphone, Xiaomi