Home /News /auto-and-tech /

Amazon Alexa : अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचं `हे` खास फीचर 8 नोव्हेंबरपासून होणार बंद

Amazon Alexa : अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचं `हे` खास फीचर 8 नोव्हेंबरपासून होणार बंद

``Amazon Alexa वर ग्राहक 8 नोव्हेंबरपासून जीमेल किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंट अक्सेस करू शकणार नाहीत``, असं अॅमेझॉननं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर : अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा (Amazon Alexa) एक अत्यंत उपयुक्त व्हर्च्युअल असिस्टंट (Virtual Assistant) आहे. परंतु, या आठवड्यातील यातील एक फीचर (Feature) बंद होणार आहे. अॅमेझॉननं केलेल्या घोषणेनुसार, या आठवड्यात 8 नोव्हेंबरपासून अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साकडे युजर्सचा ई-मेल (Email) अ‍ॅक्सेसर राहणार नाही. याचाच अर्थ युजर्स त्यांचं जीमेल (Gmail) किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंट (Microsoft Account) अ‍ॅलेक्साला लिंक करू शकणार नाहीत. मात्र, इतर कोणत्याही ई-मेल सर्व्हिस प्रोव्हायडरचा तपशील यावेळी देण्यात आलेला नाही. अ‍ॅलेक्साशी लिंक असलेले सर्व ई-मेल अकाउंट आपोआपच बंद होतील, असं सांगितलं जात आहे. याबाबत अ‍ॅमेझॉनने सांगितलं की ``एकदा हे फंक्शन बंद झाल्यानंतर युजर्स त्यांचा ई-मेल ब्राऊज (Browse) किंवा मॅनेज (Manage) करू शकणार नाहीत. यासोबतच अ‍ॅमेझॉन रिटेलर मधील ई-मेल पॅकेज ट्रॅकिंगदेखील डिसेबल (Disable) करणार आहे. असं असलं तरीही युजर्स अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून ट्रॅक करू शकणार आहेत``. ``अ‍ॅलेक्सावर ग्राहक 8 नोव्हेंबरपासून जीमेल किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंट अ‍ॅक्सेस (Access) करू शकणार नाहीत``, असं अ‍ॅमेझॉननं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी ई-कॉमर्स क्षेत्रातील या दिग्गज कंपनीनं पर्यायी ई-मेल सर्व्हिस प्रोव्हायडरविषयी माहिती जाहीर केलेली नाही. युजर्स व्हॉईस असिस्टंटचा वापर करून त्यांचा ई-मेल ब्राऊज अथवा मॅनेज करू शकणार नाहीत, हे मात्र स्पष्ट झालं आहे. Debit, Credit Card : डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डवर खरेदीसह विमा कव्हरचीही सुविधा उपलब्ध ई-मेल रुटिन आणि नोटिफिकेशन्स देखील होणार बंद अ‍ॅमेझॉननं सांगितलं की, ``अ‍ॅलेक्सावरील ई-मेल रुटिन (Email Routine) आणि ई-मेल नोटिफिकेशन (Email Notification) सपोर्टही आता बंद होणार आहे. याव्यतिरिक्त व्हाईस असिस्टंट यापुढे अॅमेझॉन व्यतिरिक्त अन्य किरकोळ विक्रेत्यांकडून येणाऱ्या पॅकेजसाठी ई-मेल पॅकेज ट्रॅकिंग सेवा देणार नाही. अ‍ॅलेक्साच्या कामकाजात बदल झाला असला तरी युजर्सला त्यात कोणताही विशेष बदल करण्याची गरज नाही. जर युजर्सनं अ‍ॅलेक्सामध्ये कॅलेंडर सिंक केलं असेल तर अ‍ॅलेक्साचं काम सुरूच राहिल,`` असं अ‍ॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे. एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा Stock? अमिताभ बच्चन यांचा आवाज करू शकता सेट युजर्स अ‍ॅलेक्सासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आवाजही (Voice) सेट करू शकतील, अशी घोषणा अ‍ॅमेझॉननं यावर्षी ऑगस्टमध्ये केली होती. हे फिचर सुरू करण्यासाठी अ‍ॅमेझॉन इंडिया आपल्या ग्राहकांकडून प्रतिवर्षी 149 रुपये शुल्क घेते. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून युजर्स अमिताभ बच्चन यांना संगीत सुरू करण्यास, बातम्या ऐकण्यास, अलार्म सेट करण्यास किंवा हवामानाविषयीची माहिती जाणून घेण्यास सांगू शकतात.
First published:

Tags: Amazon, Digital services

पुढील बातम्या