Home /News /auto-and-tech /

2.17 लाखाची Royal Enfield Classic 350 केवळ 82 हजारांत खरेदी करा, पाहा डिटेल्स

2.17 लाखाची Royal Enfield Classic 350 केवळ 82 हजारांत खरेदी करा, पाहा डिटेल्स

कमी किमतीत बुलेट खरेदी करण्याची संधी आहे. Cars24 वर लिस्टेड ही Royal Enfield Classic 350 बाईक केवळ 82 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 2 लाख 17 हजार रुपये आहे.

    नवी दिल्ली,15 जुलै: बुलेट (Bullet) चालवणं, विकत घेणं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु बुलेटची किंमत तुलनेने अधिक असल्याने सर्वांनाच ती परवडते असं नाही. परंतु आता कमी किमतीत बुलेट खरेदी करण्याची संधी आहे. Cars24 वर लिस्टेड ही Royal Enfield Classic 350 बाईक केवळ 82 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 2 लाख 17 हजार रुपये आहे. Cars24 वर लिस्टेड Royal Enfield Classic 350 चं हे मॉडेल 2014 चं आहे. ही बाईक एकूण 42,669 km चालली आहे. तुम्ही ही बाईक खरेदी केल्यास, याचे सेकंड ओनर असाल. 82 हजार रुपयांत सेकंड हँड ही गाडी खरेदी करता येईल. तसंच या बाईकचा इन्शोरन्स संपला आहे. बाईकच्या ओनरकडे या Royal Enfield Classic 350 बाईकचं ओरिजनल आरसी आहे. Royal Enfield Classic 350 इंजिन आणि फीचर्स - Royal Enfield Classic 350 काही नव्या फीचर्ससह लाँच झाली होती. या बाईकमध्ये 346cc क्षमतेच्या सिंगल सिलेंडर एअर कूल्ड UCE इंजिनचा प्रयोग करण्यात आला आहे, जो 19.3PS पॉवर आणि 28Nm टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन 5 स्पीड गियरबॉक्ससह येतं.

    (वाचा - Electric Vehicle पॉलिसचे मिळणार मोठे फायदे, वाहन खरेदीनंतर मिळेल बंपर इन्सेटिव्ह)

    Classic 350 मध्ये राउंट शेप हेडलाईटसह एनालॉग स्पीडोमीटर आहे. बाईक मार्केटमध्ये दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. पहिलं सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि दुसरं डुअल चॅनल (ABS). फीचर्समध्ये बाईकला ऑक्सिजन सेंसर, फ्यूल इंजेक्शन आणि सायलेंसर सामिल आहे. बाईक ट्यूबलेस टायर आणि एलॉय व्हीलसह उपलब्ध आहे. त्यामुळे बुलेट खरेदी करायची असल्यास, तुमच्यासाठी ही चांगली संधी ठरू शकते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Auto expo, Royal enfield 350, Tech news, Technology

    पुढील बातम्या