औरंगाबाद, 16 ऑक्टोबर: ऐन दसऱ्याच्या दिवशीच औरंगाबाद जिल्ह्यातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दसरा सणासाठी आपल्या बहिणीला आणि भाच्यांना घेऊन येत असताना, झालेल्या भीषण अपघातात (Accident on dussehra) एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत (3 died from same family in road accident) झाला आहे. सोमनाथ शेषरावर सुरे, बाली भीमा चौगुले (वय-25) असं मृत पावलेल्या बहीण भावाची नावं असून ज्योती भीमा चौगुले असं 3 वर्षीय मृत पावलेल्या भाचीचं नाव आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येखील रहिवासी असणारे सोमनाथ शेषरावर सुरे दसरा सणासाठी आपल्या बहिणीला आणायला चिंचोली लिंबाजी येथे गेले होते. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पिशोर-सिल्लोड रस्त्यावरील मोन्हंद्री फाट्यावरून जात असताना, अचानक त्यांच्या दुचाकीला एका ट्रॅक्टरने भीषण धडक दिली. यावेळी अपघातग्रस्त दुचाकीवर भाऊ, बहिणीसह तीन बालकं असे पाच जण जात होते. पण ट्रॅक्टरच्या या धडकेत आई बाली चौगुले आणि त्यांची 3 वर्षांची मुलगी ज्योती यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा-'जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन', भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घृणास्पद कृत्य
तर भाऊ सोमनाथ आणि त्याच्या अन्य दोन भाच्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना सुरे यांच्या घरापासून काही अंतरावरच घडली आहे. या अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तिघांनाही तातडीनं पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं. पण भाऊ सोमनाथ याचा रुग्णालयात जात असताना, वाटेतच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला; चाकूने वार करत केलं रक्तबंबाळ
ऐन दसऱ्याच्या दिवशी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सुरे आणि चौगुले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद पिशोर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पण अपघात करणारा ट्रॅक्टर नेमका कोणाचा होता. याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पोलीस ट्रॅक्टरचा आणि चालकाचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Aurangabad, Crime news