मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन', विरारमध्ये भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घृणास्पद कृत्य

'जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन', विरारमध्ये भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घृणास्पद कृत्य

Rape in Virar: विरारमध्ये एका भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत (Lure of money rain) चार महिलांवर अत्याचार (4 women raped by bhondubaba) केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
विरार, 16 ऑक्टोबर: विरारमध्ये एका भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत (Lure of money rain) चार महिलांवर अत्याचार (4 women raped by bhondubaba) केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून पीडित महिलांची आर्थिक फसवणूक (Raped and money fraud) देखील केली आहे. तसेच 'जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन', अशी धमकी देऊन पीडित महिलांवर अनेकदा अत्याचार केला आहे. याप्रकरणी चारही पीडित महिलांनी विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या अन्य एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी अशाच प्रकारे इतरही अनेक महिलांवर अत्याचार केला असावा. तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अर्नाळा सागरी दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहे. मॅथ्यू पंडियन असं अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव असून दिनेश देवरुखकर असं अटक केलेल्या आरोपी साथीदाराचं नाव आहे. हेही वाचा-बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्समधील वरिष्ठ डॉक्टरचं कृत्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार येथील रहिवासी असणाऱ्या एका 26 वर्षीय पीडित महिलेला आर्थिक चणचण होती. दरम्यान, जुलै महिन्यात पीडित महिलेच्या परिचयाच्या दिनेश देवरुखकरने तिला मॅथ्यू पंडियनची माहिती दिली. तसेच तुझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, असं पटवूनही दिलं. आरोपी दिनेशच्या भूलथापांना बळी पडून पीडित महिला भोंदूबाबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. आरोपी पंडियनने पूजा करण्यासाठी तिच्याकडून दहा हजार रुपये घेतले. तसेच पूजा संपन्न झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडेल, असं सांगितलं. हेही वाचा-कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; 7 वर्षांनी सांगितली आपबीती यानंतर आरोपीनं पूजा करण्याच्या बहाण्याने पीडितेवर बलात्कार केला. तसेच घटनेची वाच्यता कुठेही केल्यास 'जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन' अशी धमकीही आरोपीने पीडित महिलेला दिली. यानंतर आरोपीनं असाच प्रकार पीडित महिलेच्या अन्य तीन मैत्रिणींसोबत देखील केला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
First published:

Tags: Crime news, Rape, Virar

पुढील बातम्या