मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला; चाकूने वार करत केलं रक्तबंबाळ

उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला; चाकूने वार करत केलं रक्तबंबाळ

Crime in Ulhasnagar: गुरुवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला (Knife attack on police) केला आहे.

Crime in Ulhasnagar: गुरुवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला (Knife attack on police) केला आहे.

Crime in Ulhasnagar: गुरुवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला (Knife attack on police) केला आहे.

उल्हासनगर, 16 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता थेट ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवर देखील हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. गुरुवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला (Knife attack on police) केला आहे. या दुर्दैवी घटनेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी (Police injured) झाले आहेत. त्याच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित घटना गुरुवारी रात्री उशिरा उल्हासनगर शहराच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन 30 परिसरात घडली आहे. संबंधित दोन्ही पोलीस या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, याठिकाणी दोन गटांमध्ये पैशावरून वाद होऊन एकमेकांवर जीवघेणा हल्ला करत होते. यावेळी गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड यांनी दोन्ही गटात मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या हल्लेखोरांनी डमाले आणि राठोड दोघांवरही चाकू हल्ला केला आहे. या घटनेत पोलीस अंमलदार गणेश डमाले गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा- 'जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन', विरारमध्ये भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घृणास्पद कृत्य

नेमकं प्रकरण काय आहे?

संजय शितलानी आणि नरेश लेफ्टी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशावरून वाद होते. नरेश हा संजयकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. यामुळे अविनाश नायडू याने संजयकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी संजय आणि अविनाश हे मध्यरात्री नरेशला भेटण्यासाठी सेक्शन 30 परिसरात आले. यावेळी दोन गटांत बाचाबाची झाली. यानंतर नरेशच्या टोळीने संजय आणि अविनाश या दोघांवर चाकूने वार केले.

हेही वाचा-कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; 7 वर्षांनी सांगितली आपबीती

हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर, गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केला. कोणत्याही सरकारी शस्त्राशिवाय वाद मिटवण्यासाठी गेलेल्या या दोन्ही पोलिसांवर नरेशच्या टोळीने चाकू हल्ला केला. यावेळी आरोपींनी संजय शितलानी आणि अविनाश यांच्यावर देखील अनेक वार केले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आलं आहे.

First published:

Tags: Attack on police, Crime news, Ulhasnagar