मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /माझा लेक गेला, दुसऱ्याच दिवशी आईनेही सोडले प्राण, एकाच कोविड सेंटरमध्ये घेत होते उपचार!

माझा लेक गेला, दुसऱ्याच दिवशी आईनेही सोडले प्राण, एकाच कोविड सेंटरमध्ये घेत होते उपचार!

एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना आई आणि मुलाच्या निधनामुळे मिसाळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना आई आणि मुलाच्या निधनामुळे मिसाळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना आई आणि मुलाच्या निधनामुळे मिसाळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

कन्नड, 20 जून : मराठवाड्यात (Marathwada) कोरोनाची (Corona) परिस्थितीत आटोक्यात येत असली तरी ग्रामीण भागात मृत्यूच्या घटना कायम घडत आहे. पोटचा तरुण आणि घरातला कर्त्या मुलाचं निधन झाल्याची बातमी आईला समजताच तिनेही प्राण सोडल्याची मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबादमधील (Aurangabad) कन्नड (kannad) तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील औराळा इथं शुक्रवारीही दुर्दैवी घटना घडली. अनिल तोताराम मिसाळ (वय 50) यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना तातडीने गंगापूर येथील लासूर स्टेशनजवळ आमदार प्रशांत बंब यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मुलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील सर्वजण चिंतातूर होते. त्यातच आई भागिरथीबाई (वय 80) यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी याच कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुलावर आणि आईवर एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान, अनिल मिसाळ यांची तब्येत अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं, असं वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिलं आहे.

साप्ताहिक राशीभविष्य: पौर्णिमा कुठल्या राशीला ठरणार फलदायी?

भागिरथीबाई आपल्या मुलासह कोविड सेंटरमध्ये एकत्र असल्यामुळे लेकराची त्या काळजी घेत होत्या. तब्येतीबद्दल विचारपूस करत होत्या. पण 10 ते 12 उलटले तरी आपल्या मुलाबद्दल कुणी काही सांगत नव्हतं. त्यामुळे त्यांना मुलाबद्दल चिंता लागून होती. त्यांनी उपस्थितीत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता मुलांचं निधन झाल्याचं त्यांना कळलं. आपल्या लेक आता जगात नाही, हे एकूण भागिरथीबाई यांना धक्का बसला.  मुलाच्या मृत्यूमुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी भागिरथीबाई यांनीही मुलाच्या विरहामुळे कोविड सेंटरमध्येच प्राण सोडले.

घरबसल्या सहज करा LPG गॅस बुकिंग, एक मिस्ड कॉल किंवा WhatsApp मेसेजने होईल हे काम

एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना आई आणि मुलाच्या निधनामुळे मिसाळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. आई आणि मुलावर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Corona, Covid-19