मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /साप्ताहिक राशीभविष्य: पौर्णिमा कुठल्या राशीला ठरणार फलदायी?

साप्ताहिक राशीभविष्य: पौर्णिमा कुठल्या राशीला ठरणार फलदायी?

12 तारखेला जन्मलेले लोक स्पष्टवक्ते असतात.

12 तारखेला जन्मलेले लोक स्पष्टवक्ते असतात.

24 जून रोजी असलेल्या पौर्णिमेच्या प्रभावातून हा आठवडा अनेक राशींना शुभ फळ देणारा ठरेल. हा आठवडा तुम्हाला कसा जाणार? नियोजित कामं होणार का, कुठले अडथळे येणार? वाचा सविस्तर...

रविवार म्हणजे नव्या आठवड्याचे वेध. साक्षात सूर्याचा वार. हा आठवडा तुम्हाला कसा जाणार? नियोजित कामं होणार का, कुठले अडथळे येणार? जाणून घ्या तुमच्या राशीच्या भविष्यात काय आहे? या आठवड्यात येणारी पौर्णिमा अनेक राशींसाठी फलदायी ठरणारी आहे. वाचा सविस्तर...

आज रविवार दिनांक 20 जून 2021.आज ज्येष्ठ शुद्ध दशमी तिथी असून दिवस  शुभ आहे. आजचे  ग्रहमान सूर्य मिथुन राशीत शुक्रासोबत

असून शनी मकर राशीत वक्री आहे. मंगळ कर्क राशीत नीच अवस्थेत आहे तर गुरू कुंभ राशीत  20 जून ला वक्री होणार आहे. राहू बुध  वृषभ राशीत व केतू वृश्चिकेत असणार आहे. या आठवड्यात काही ग्रह राशीबदल करणार आहेत. 24 जून रोजी असलेल्या पौर्णिमेच्या प्रभावातून हा आठवडा  अनेक राशींना शुभ फळ देणारा ठरेल.

बघू या हा सप्ताह कुठल्या राशीला  काय फळ देणारा आहे ते..

मेष

राशिस्थानी मंगळ चतुर्थ स्थानात नीच अवस्थेत भ्रमण करीत आहे. कधीतरी कामात  दिरंगाई, शरीर ऊर्जा हीन, व शिथिल  वाटेल .22 जून रोजी शुक्र कर्क राशीत  प्रवेश करेल. त्यानंतर  घर ही तुमची प्राथमिकता राहील. व्यवसाय  उद्योगात इतरांचे  मत विचारात घ्यावे. जमीन खरेदी योजना तूर्तास नको. आर्थिक लाभ  होतील. पण  शेअर बाजारातील गुंतवणूक  सांभाळून करा. पराक्रमाची वाढ होईल. पोटा संबंधी विकार असतील तर काळजी घ्यावी.

दशम शनी  कार्य क्षेत्रात सावकाश  प्रगती  घडवतील. लाभतील गुरू  वक्री अवस्थेत  जात आहे. आठवडा  शुभ आहे.

वृषभ

या आठवड्यात राशिस्थानी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. तिथे तो मंगळा सोबत राहील. स्त्री वर्ग जसे बहिण,वहिनी या  मदत  करतील. आर्थिक लाभ होतील. नवीन कपडे  खरेदी होईल. भाग्य  धीम्या गतीने  साथ देते आहे. दशमातील वक्री गुरू  कामाच्या ठिकाणी  शुभ.

शांत  व  संयमाने वागून नक्की चांगले  फळ मिळेल. नौकरीत तुमची प्रशंसा होईल. पौर्णिमेच्या जवळ शुभ परिणाम मिळतील.

मिथुन

राशीच्या धनस्थानातील शुक्राचे भ्रमण अत्यंत शुभ फळ देईल.  अकस्मात कुठून तरी  धन प्राप्ती  होईल. तेजस्वी व्यक्तिमत्त्व, वाणीत  ओज ,निर्माण होईल.  भाग्या तील गुरू वक्री होत आहे.  शनि प्रभाव  वाढेल. शनी उपासना  ही वाढवा .नौकरी व्यवसायातून लाभ  मिळेल. वाहवा होईल. संतती पासून सुख  मिळेल. आठवडा  एकुण शुभ  आहे.

कर्क

राशीत प्रवेश करणारा शुक्र इतके दिवस होणारी  चिडचिड कमी करेल. मौजमजा, खरेदी  इकडे  कल होइल .भाऊबंद त्रास देत असतील तर दुर्लक्ष करू नका. राशीतील मंगळ शनी सोबत  दृष्टी योग करीत आहे. कामे  संथ गतीने होतील. पण दिलेला पैसा परत  मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह अनुकूल आहे.

सिंह

राशी स्वामी रवी  गुरूशी  नव पंचम योग करीत आहे. धर्मकारण कराल. धर्मात रुची निर्माण होईल. यश,प्रसिद्धी मिळेल. पौर्णिमा शुभ योगाची. नवीन ओळखी  व्यवसाय,अधिकारी योजना  ,भागीदारी यश देणारे ठरेल. मात्र मंगळ शुक्र खर्चावर  नियंत्रण  ठेवा,वाहन जपुन चालवा असे सुचवत आहेत. डोळ्यांची काळजी घ्या. सप्ताह  उत्तम जाईल.

कन्या

दशमातील रवि सर्व तर्‍हेने अधिकार देईल. वरीष्ठ खुश होतील. नवीन संधी मिळेल. लाभतील शुक्र मैत्रिणी कडुन लाभ देईल. राशी स्वामी बुध राहू सोबत  आहे  भाग्य  स्थानात जडत्व निर्माण झाले आहे. सरकारी कामे, कोर्ट कचेरी  यश देईल. पण संथ गतीने. पौर्णिमेच्या शुभ प्रभावा खाली उत्तम आठवडा आहे.

तुला

दशमात  येणारा शुक्र नवीन संधी निर्माण करणार आहे. मंगळ  प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. सुर्य  भाग्य उज्ज्वल करेल. पौर्णिमेच्या जावळ अनपेक्षित घटना  घडतील. धनलाभ संभवतो. तरुण वर्गाला हा आठवडा शुभ आहे. मात्र  भागीदार वाद विवाद करतील. चतुर्थातील शनी महाराज  घरात थोडी  कुरबूर  किंवा आई वडीलांचे प्रश्न निर्माण करतील. गुरुकृपा  आहे आठवडा  शुभ.

वृश्चिक

भाग्य स्थानात येणारा शुक्र भाग्याचा नवीन वाटा खुल्या करेल. मात्र दुसर्‍याचे  म्हणणे पण ऐकून घ्यावे. जोडीदार कधीतरी  नाराज होईल.त्यांना समजून घ्यावे लागेल. या सुमारास  काही नवीन ओळखी  घनिष्ट होऊ शकतात. सांभाळुन रहा. संतती, गृहसौख्य  उत्तम मिळेल. पौर्णिमा शुभ संकेत  देईल. प्रकृती  जपा. भावंडाची मर्जी  सांभाळा. अधिकारी वर्ग  सहकार्य  करणार नाही. सप्ताह शुभ.

धनु

अष्टमात  प्रवेश करणारा  शुक्र मंगळा बरोबर  योग करीत आहे. शनिच्या प्रतियोगात असल्यामुळे अत्यंत  काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. काही  विचित्र दुखणी  त्रास देतील.  जुने आजारपण डोके वर काढेल. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. पौर्णिमेच्या आसपास  सावध राहा. रवी गुरू शुभ योग मात्र मदत करेल. मध्यम  सप्ताह..

मकर

राशीतील  वक्री शनी ,समोर आलेले  मंगळ शुक्र. काळ कठीण आहे. जपून पावले टाका. जोडीदाराची काळजी  घ्या. मात्र व्यवसायातून अचानक  धनलाभ  होईल. वास्तु संबंधी  काही निर्णय  घ्यावे लागतील. सांभाळून  असा. जुनी देणी वसूल होतील. गुरुकृपा  तारून नेईल. मात्र शनीची उपासना चालू ठेवा.

कुंभ

षष्ठ स्थानात  येणारे शुक्र मंगळ ,राशीतील वक्री गुरू व व्यय स्थानातील शनी  हे ग्रहमान फारसे

अनुकूल नाही. रक्तदाब, मधुमेह  असणार्‍यांनी काळजी घ्या. तरुणांना कार्य क्षेत्रात लक्ष  द्यावे  लागेल. पंचमात सुर्य  संतती  संबंधी  शुभ घटना दर्शवतो. पौर्णिमेच्या शुभ प्रभावातून आठवडा  ठीक जाईल. गुरु जप  करावा.

मीन

पंचमातील मंगळ शुक्राचे  भ्रमण  संतती संबंधी काही वार्ता  येतील. घरातल्या तरुणांना काही नवीन ओळखी, होतील.संयम पाळा. वस्तु,जमीन खरेदी व्यवहार  सध्या टाळा. समाजासाठी, धर्मासाठी खर्च होईल. तृतीय राहू बुध  संभाषण  जपुन करा. घरातील सजावट बदलावी  अशी इच्छा  होईल. खर्च  जपुन. पौर्णिमा  शुभ योगाची.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya