• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • घरबसल्या सहज करा LPG गॅस बुकिंग, एक मिस्ड कॉल किंवा WhatsApp मेसेजने होईल हे काम

घरबसल्या सहज करा LPG गॅस बुकिंग, एक मिस्ड कॉल किंवा WhatsApp मेसेजने होईल हे काम

LPG Gas Cylinder Booking: ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणं काही काळापूर्वी एक किचकट प्रक्रिया होती. मात्र आता विविध कंपन्यांनी ही प्रक्रिया सोपी केली आहे. घरबसल्या अगदी सहजगत्या तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 जून: एलपीजी गॅस सिलेंडर बुक (LPG Gas Cylinder Booking) करणं ही प्रक्रिया आता अतिशय सोपी होऊ लागली आहे. घरबसल्या तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. तुम्ही केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून (Book Gas Cylinder by giving missed call) किंवा WhatsApp मेसेज करून गॅस सिलेंडरचे बुकिंग करू शकता. इंडेन गॅसने त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. इंडेन गॅसच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, मिस्ड कॉलवरून गॅस सिलेंडर बुकिंगची सुविधा 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. तुम्ही इंडेनचे ग्राहक असाल तर विविध मार्गांनी तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करता येईल. indane.co.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून, रजिस्टर्ड मोबाइलवरुन SMS करून, इंडने गॅसच्या App च्या माध्यमातून तुम्ही बुकिंग करू शकता. सामान्य पद्धतीने गॅस बुकिंग करण्यासाठी तुम्ही 7718955555 या क्रमांकाचा वापर करू शकता. इंडेनने जारी केलेला हा कॉमन क्रमांक आहे. शिवाय आता मिस्ड कॉल आणि WhatsApp च्या साहाय्याने देखील ही प्रक्रिया शक्य आहे. हे वाचा-मोदी सरकारच्या या योजनेत दरमहा जमा करा 55 रुपये, तुमच्या खात्यात येतील 36 हजार Indane Gas केवळ एक मिस्ड कॉल देऊन बुक करू शकता. याशिवाय मिस्ड कॉल करूनच तुम्हाला नवीन कनेक्शन देखील मिळेल. इंडेनच्या या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाचा वापर करावा लागेल. इंडेन गॅसने ही सुविधा देण्यासाठी एक क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून कंपनीने जारी केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिला तर तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल. मिस्ड कॉलच्या साहाय्याने बुकिंग इंडियन ऑइलने (Indian Oil) एलपीजी ग्राहकांना आता देशातील कोणत्याही भागातून मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करण्याची सुविधा देत आहेत. मिस्ड कॉलसाठी इंडेनने हा क्रमांक जारी केला आहे- 8454955555. मिस्ड कॉलच्या माध्यमातून सिलेंडर बुक करणे अतिशय सोपी पद्धत आहे. याआधी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला एका कॉलवर दीर्घकाळ वाट पाहावी लागत असे. शिवाय मिस्ड कॉलच्या माध्यमातून बुकिंग करण्याचा एक फायदा हा देखील आहे की, आयव्हीआरएस कॉल्स प्रमाणे ग्राहकांना याकरता कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. या सुविधेमुळे त्या लोकांसाठी एलपीजी गॅस बुक करणे सोपे होईल, ज्यांना IVRS कॉल दरम्यान समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी देखील ही सुविधा अत्यंत चांगली आहे. हे वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही देखील होऊ शकता मालामाल, हे आहेत 4 पर्याय याशिवाय इतरही काही कंपन्या मिस्ड कॉल बुकिंगची सुविधा देतात. BPCL चे ग्राहक 7710955555 या क्रमांकावर तर एचपीचे ग्राहक 9493602222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन एलपीजी गॅस सिलेंडरचं बुकिंग करू शकतात. WhatsApp च्या माध्यमातून बुकिंग व्हॉट्सअॅपवर REFILL असा मेसेज टाइप करून 7588888824  या क्रमांकावर तुम्हाला पाठवावा लागेल. केवळ रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरूनच तुम्ही हा मेसेज करू शकता. तुम्ही बुक केलेल्या गॅस सिलेंडरचं स्टेटस चेक करण्यासाठी STATUS# आणि ऑर्डर नंबर लिहू त्याच क्रमांकावर पाठवाला लागेल त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. ही सेवा बीपीसीएल आणि एचपीच्या ग्राहकांना देखील मिळेल. यासाठी तुम्हाला अनुक्रमे 1800224344 आणि 9222201122 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: