Home /News /aurangabad /

Aurangabad: आईसमोर वाईट बोलल्यानं तरुणाची सटकली; भररस्त्यात मित्राची चाकू भोकसून हत्या

Aurangabad: आईसमोर वाईट बोलल्यानं तरुणाची सटकली; भररस्त्यात मित्राची चाकू भोकसून हत्या

Murder in Aurangabad: आईसमोर वाईट बोलल्यानं (speak bad in front of mother) एका तरुणानं आपल्या मित्राची भररस्त्यात चाकूनं भोकसून (Young man stabbed friend with knife) निर्घृण हत्या केली आहे.

    औरंगाबाद, 23 जुलै: आईसमोर वाईट बोलल्यानं (speak bad in front of mother) एका तरुणानं आपल्या मित्राची भररस्त्यात चाकूनं भोकसून (Young man stabbed friend with knife) निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर पोलिसांनी गुरुवारी रात्रीच आरोपी तरुणाला अटक (Accused arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास जिन्सी पोलीस करत आहेत. मंगेश दिनकर मालोदे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. तर शेख अरबाज उर्फ विशाल शेख अहमद असं आरोपी तरुणाचं नाव आहे. मृत मंगेश मालोदे आणि शेख अरबाज हे दोघंही चांगले मित्र होते. दरम्यान गुरुवारी सायंकाळी मृत मंगेश आरोपीच्या आईसमोर अरबाजला वाईट बोलला होता. हा राग मनात धरून आरोपीनं आपल्या मित्रावरच जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. हेही वाचा-क्रूरता! रेल्वे कर्मचारी पतीनं हुंड्यासाठी गरोदर पत्नीचे केले 12 तुकडे संबंधित घटना गुरुवारी रात्री औरंगाबाद येथील संजयनगर परिसरात घडली आहे. मृत मंगेश नेमक्या कोणत्या कारणातून अरबाजला आईसमोर वाईट बोलला होता, याची माहिती अद्याप समोर आली नाही. हेही वाचा-धक्कादायक! जीन्स घालते म्हणून काकानं केला पुतणीचा खून, आजोबांनीही दिली साथ या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृत मंगेशचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. त्याचबरोबर आरोपी शेख अरबाज ऊर्फ विशाल शेख अहमद यालाही अटक केली आहे. पोलीस सध्या हत्येमागील नेमक्या कारणाचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास जिन्सी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Murder

    पुढील बातम्या