Home /News /national /

6 लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीची निर्घुण हत्या, रेल्वे कर्मचारी पतीनं कुदळीनं केले 12 तुकडे

6 लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीची निर्घुण हत्या, रेल्वे कर्मचारी पतीनं कुदळीनं केले 12 तुकडे

Bihar crime news: पतीला नोकरीत प्रमोशन मिळाले तरी 6 लाख रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी त्याने आपल्या गर्भवती पत्नीची कुदळीने तुकडे करून निर्घृण हत्या केली.

बिहार, 22 जुलै: सध्याच्या काळात स्त्री ही सक्षम समजली जाते. अर्थात तिची वाटचाल देखील सक्षमीकरणाकडे सुरुच आहे. मात्र कधीकाळी हुंडा (Dowry) बळीचा सामना कराव्या लागणाऱ्या महिलांना आजही या समस्येचा सामना कमीअधिक प्रमाणात करावा लागत आहे. बिहारमध्ये नुकतीच हुंडाबळीची एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. पतीला नोकरीत प्रमोशन मिळाले तरी 6 लाख रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी त्याने आपल्या गर्भवती पत्नीची कुदळीने तुकडे करून निर्घृण हत्या (Murder) केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र हुंडाबळी ठरलेल्या या महिलेच्या माहेरकडील मंडळींनी या प्रकरणात पोलिसांनी (Police) ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. बिहारमधील (Bihar) नालंदा जिल्ह्यातील हिलसा पोलीस स्टेशनच्या क्षेत्रातील नोनिया बिगहा गावात ही घटना घडली. गर्भवती असलेल्या काजलची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे कुदळीने 12 तुकडे करण्यात आले. त्यानंतर तिचे पार्थिव जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर घरापासून सुमारे 400 मीटर अंतरावर हे तुकडे दफन करण्यात आले, असा आरोप काजलच्या माहेरच्या मंडळींनी केला. ‘17 जुलैला रात्री माझे काजलशी बोलणे झाले. त्यानंतर तिचा मोबाईल बंद होता. 18 जुलैला माझ्या वडिलांनी काजलच्या पती आणि सासऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु, मोबाईल बंद होता. 19 जुलैला आम्ही सर्वजण काजलच्या सासरी गेलो. त्यावेळी तिच्या सासरची मंडळी फरार झाली होती. त्यामुळे तिथेच आम्हाला तिची हत्या झाली असावी,’ अशी शंका आल्याचे काजलच्या भावाने सांगितले.

प्रेम प्रकरण आर्मी जवानाच्या अंगाशी; एकाच घरात दोन पत्नींचा करावा लागतोय सामना

याबाबत या सोमवारी आम्ही काजलचा पती, सासरा आणि सासरकडील 7 लोकांविरोधात हिलसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी ही घटना फारशी गांभीर्यानं घेतली नाही आणि याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे काजलच्या माहेरच्या मंडळींनी सांगितले. त्यानंतर पोलीस बुधवारी नोनिया बिगहा गावात गेले. ज्या ठिकाणी पार्थिव दफन केलं होतं. त्याठिकाणी खोदकाम केलं असता, काजलच्या पार्थिवाचे तुकडे त्यांना सापडले. त्यानंतर हे तुकडे एका पिशवीत भरण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याऐवजी संथ भूमिका घेतली, असे जनसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

क्रुरतेचा कळस! इन्स्टाग्राम LIVE करत हत्येचा थरार, जुळ्या बहिणींना निर्दयीपणे संपवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी रेल्वे विभागातील चतुर्थ श्रेणीतील कामगार संजीत याचा विवाह काजल हिच्याशी झाला होता. नुकतेच संजीतला प्रमोशन (Promotion) मिळाले होते. त्यामुळे शिपाई पदावरुन तो टीटीई झाला होता. त्यानंतर संजीत आणि त्याचे कुटुंबीय काजलने माहेरच्या मंडळींकडून आणखी 6 लाख रुपयांचा हुंडा आणावा यासाठी तिला मारहाण करत होते. अखेरीस सासरकडील मंडळींनी तिची हत्या केली. याबाबत हिलसा पोलिस स्टेशनचे अधिकारी श्याम किशोर सिंह यांनी सांगितले की या प्रकरणाचा अधिक तपास (Investigation) सुरु आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने संशयितांना अटक करण्यासाठी छापासत्र सुरु आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bihar, Murder

पुढील बातम्या