मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /'एकच बायको सात जन्मी नको' औरंगाबादेत पुरुषांनी केलं पिंपळाचं पूजन!

'एकच बायको सात जन्मी नको' औरंगाबादेत पुरुषांनी केलं पिंपळाचं पूजन!

'काही महिला आपल्या पतीला नाहक छळतात. केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो.

'काही महिला आपल्या पतीला नाहक छळतात. केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो.

'काही महिला आपल्या पतीला नाहक छळतात. केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो.

औरंगाबाद, 23 जून : आज वटपौर्णिमा (vat purnima)...त्यामुळे महिला आपल्या पतीला चांगले आरोग्य लाभो अशी कामना करतात. 'हाच नवरा सातजन्मी मिळू दे' म्हणूनही आज वडाची विधिवत पूजा करतात. विवाहित महिला हा विधी पूर्ण साज शृंगारात करतात. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पण वटपौर्णिमेच्या दिवशीच औरंगाबादेत (aurangabad) काही पुरुष पिंपळाची पूजा करतात आणि चक्क मागणी करतात की, 'आयुष्यभर छळ करणारी तीच बायको नको, आम्हाला अविहाहीत ठेवा', असं साकडं ते थेट यमराजला घालतात.

वटपौर्णिमा हा महिलांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस...गेल्या अनेकवर्षणापासून महिला ही पूजा करतात. पुढच्या सातजन्मी हाच पुरुष नवरा म्हणून मिळू दे अशी याचना करतात. हे सर्व विधी होतात, वडा खाली कारण, सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजकडून परत मिळवले होते. ती जागा होती वडाची.

WTC Final : 'ही न्यूझीलंडची आजवरची बेस्ट टीम', दिग्गजानं थोपटली विल्यमसनची पाठ

औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुष संघटना आहे. जी महिलांपासून नाहक खोट्या केसेसमध्ये अडकलेले आहेत अश्या पुरुषांना ही संघटना पाठबळ देते.  या संघटनेचे सदस्य पुरुष पिंपळाला फेऱ्या मारतात. तेही वटसावित्रीच्या एक दिवस आधी. हे पुरुष वडाला नाही तर पिंपळाला दोरा धरून फेऱ्या मारतात. या फेऱ्याही उलट्या असतात. महिलाप्रमाणेच तेही यमाला साकडे घालतात. त्याची मागणी महिलांच्या मागणीपेक्षा उलटी आहे. आहे तीच पत्नी मला पुढच्या जन्मी नको, त्यापेक्षा आम्हाला अविवाहित ठेव अशी याचना ती करत आहेत.

सौरऊर्जेबाबत Relianceचं मोठं पाऊल, मोदींचं हे लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्णय

'काही महिला आपल्या पतीला नाहक छळतात. केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो. छळलेला पती परत सात जन्मी मिळावा अशी मागणी करतात, असं पत्नी पीडित पुरुष संघटनेचं म्हणणं आहे.

वट पौर्णिमेला महिलांची ही मागणी पूर्ण होउ नये यासाठी हे पुरुष वटसावित्रीच्या एक दिवसाआधी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारून महिलांची मागणी पूर्ण होऊ नये, अशी याचना करतात. हे गंमतीशीर असेल तरी महिला आणि पुरुषांच्या परस्परविरोधी मागणीमुळे यमराज कन्फ्युज होईल का, हा प्रश्न निर्माण होतो.

First published: