मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : 'ही न्यूझीलंडची आजवरची बेस्ट टीम', दिग्गजानं थोपटली विल्यमसनची पाठ

WTC Final : 'ही न्यूझीलंडची आजवरची बेस्ट टीम', दिग्गजानं थोपटली विल्यमसनची पाठ

केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली न्यूझीलंड टीमनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं (WTC) विजेतेपद पटकावलं आहे. या टीमनं न्यूझीलंडची 21 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

साऊथम्पटन, 24 जून : केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली न्यूझीलंड टीमनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं (WTC) विजेतेपद पटकावलं आहे. या टीमनं न्यूझीलंडची 21 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. यापूर्वी 2000 साली न्यूझीलंडनं टीम इंडियाचाच पराभव करत आयसीसी (ICC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. या ऐतिहासिक कामगिरीनंतर न्यूझीलंडच्या महान क्रिकेटपटूनं केन विल्यमसनची पाठ थोपटली आहे.

विल्यमसनची ही टीम आजवरच्या इतिहासातील न्यूझीलंडची सर्वोत्तम टीम असल्याचं मत महान क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली (Richard Hadlee) यांनी व्यक्त केलं आहे.हॅडली यांनी या विजेतेपदानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे की, "हा न्यूझीलंड क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे. फायनल टेस्टमध्ये अनेक चढ-उतार झाले. न्यूझीलंडनं टीम इंडियाच्या विरुद्ध सरस खेळ केला. गेल्या काही वर्षांपासून न्यूझीलंडकडे अनेक चांगले क्रिकेटपटू आहेत.

"ही न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वश्रेष्ठ टीम आहे. गेल्या दोन वर्षातील जबरदस्त कामगिरीचे हा विजय म्हणजे उदाहरण आहे. गेल्या दोन वर्षात न्यूझीलंडच्या टीमनं सर्वोत्तम खेळ करत विदेशात टेस्ट सीरिज जिंकली आहे. त्यामुळे त्यांचा विजेतेपदावर हक्क होता. खेळाडूंनी उच्च प्रतीच्या व्यावसायिक खेळाचे प्रदर्शन केले. एक दुसऱ्याला मदत करत संघभावनेनं खेळ केला. यासाठी टीम मॅनेजमेंट आणि सहयोगी स्टाफ यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली." असे हॅडली यांनी स्पष्ट केले

'आता बदल होणार', पराभवानंतर नाराज विराट कोहलीचा गंभीर इशारा

यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याने या विजयाचे श्रेय पूर्ण टीमला दिले आहे. हे विजेतेपद पटकवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, ते सर्व प्रशंसेसाठी पात्र आहेत. हे विजेतेपद दीर्घकाळ स्मरणात राहील." अशी भावना विल्यमसननं व्यक्त केली.

First published:

Tags: Cricket, New zealand