मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रात्री 2 वाजता घरात शिरून कॉन्स्टेबलचा महिलेवर Rape; रंगेहाथ सापडल्यानं नातेवाईकांनी बेदम चोपलं

रात्री 2 वाजता घरात शिरून कॉन्स्टेबलचा महिलेवर Rape; रंगेहाथ सापडल्यानं नातेवाईकांनी बेदम चोपलं

सोमवारी रात्री ही दलित  महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला होता. तेथे त्याने महिलेला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला.

सोमवारी रात्री ही दलित महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला होता. तेथे त्याने महिलेला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला.

सोमवारी रात्री ही दलित महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला होता. तेथे त्याने महिलेला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला.

  • Published by:  News18 Desk

बाडमेर, 12 ऑक्टोबर : एका पोलीस हवालदाराने दलित महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याची (Police constable raped dalit woman) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित पीडितेनं आरडाओरड केल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारील लोक जागे झाले. त्यांनी या नराधम कॉन्स्टेबलला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. यामुळे आरोपी हवालदार जखमी झाला आहे. त्याला जिल्हा मुख्यालयातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हा सर्व प्रकार भारत-पाकिस्तान सीमेवरील बारमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल सुलतान सिंह हे बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलीस ठाण्यात तैनात आहेत. सोमवारी रात्री ही दलित  महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला होता. तेथे त्याने महिलेला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. या दरम्यान, पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या कुटुंबातील इतरांना जाग आली. त्यांनी घटनास्थळी पोलीस हवालदाराला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. यामुळे हवालदार जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक आनंद सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

हे वाचा - देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

पोलीस अधीक्षक आनंद शर्मा म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी कॉन्स्टेबलला बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेने कॉन्स्टेबल सुल्तान सिंग याच्यावर रात्री 2 वाजता घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचा - अभिनेत्रीच नव्हे तर राज्यस्तरीय कब्बडीपटू आहे सई ताम्हणकर;कराटेमध्येही मिळालं होतं ऑरेंज बेल्ट

राजस्थान पोलिसांची प्रतिमा आणखी खराब

यापूर्वीही अनेक पोलिसांवर बलात्काराचे आरोप झाले आहेत. अलवरमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात बांधलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर बेवारचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक हिरालाल सैनी यांनी महिला कॉन्स्टेबलसह जलतरण तलावात आंघोळ केल्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात हिरालाल आणि महिला हवालदाराने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

First published:

Tags: Rape case, Rape news