मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /Aurangabad Crime: महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये बलात्कार, VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

Aurangabad Crime: महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये बलात्कार, VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

औरंगाबादमध्ये तरुणीवर कारमध्ये बलात्कार, VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

औरंगाबादमध्ये तरुणीवर कारमध्ये बलात्कार, VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

औरंगाबादमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका कॉलेजच्या तरुणीवर कारमध्ये अत्याचार करण्यात आल्याची घटनेने खळबळ उडाली आहे.

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 17 मे : महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये आत्याचार (college girl raped in car) करून मित्राच्या मदतीने व्हिडीओ बनवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. इतकेच नाही तर बलात्काराचा हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. औरंगाबाद (Aurangabad)मधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर आत्याचार करण्यात आला. इतकेच नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात येत होती. ही घटना रविवारी (15 मे) उघडकीस आली आहे.

पीडित 22 वर्षीय तरूणी ही आई वडीलांसह राहते. ती एका महाविद्यालयत एम कॉम प्रथम वर्षाचे शिक्षण घेते. 25 जुलैला आरोपी अक्षय साठे याने त्या तरूणीला फोन करून मित्राला नोट्स पाहिजे ते घेण्यासाठी औरंगाबादला येत असल्याचे सांगितले. अक्षय हा त्याच्या मित्रासह औरंगाबादला आला. त्यानंतर अक्षय आणि त्या तरूणीची भेट झाली. त्यावेळी तुला घरी सोडते असे सांगत त्या तरुणीला कारमध्ये बसवले.

वाचा : असा नराधम नवरा नकोच, लग्नानंतर एक मुलगा, सहा वर्षांनंतरही..., गोंदियातील धक्कादायक घटना

दरम्यान त्या तरुणीला घरी न सोडता अक्षय याने कार तिसगाव फाटा या रस्त्याकडे वळविली.  त्यावेळी कार थांबवून लगट करण्यास सुरुवात केली. त्या कृत्याला विरोध करत तरूणीने अक्षयला समाजविण्याचा प्रत्यन केला. मात्र अक्षयने त्या तरुणीवर जबरदस्तीने आत्याचार केला.

यावेळी अक्षय सोबतच्या मित्राने याची  मोबाइलमध्ये व्हिडीओ शूटिंग केली. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देत त्या तरूणीला घरी सोडले. त्यानंतर सुद्धा हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. अखेर तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : दोन प्रियकर अन् एका प्रेयसीमध्ये राडा; PUBG वर जुळलेल्या प्रेमाचा असा झाला शेवट

ग्वाल्हेरमध्ये भावाच्या मेहुण्यानेच वेळ साधत तरुणीचे काढले अश्लिल फोटो

ग्वाल्हेरमध्ये एका तरुणीला अश्लील फोटोंद्वारे ब्लॅकमेल करून तिच्यासोबत गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने मंदिरात तरुणीसोबत लग्न केल्याचे नाटक केले. तिच्यासोबत फोटोही काढले. यानंतर तिला सोबत घेऊन गुजरातला निघून गेला. इथे तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत दुष्कर्म करत राहिला. आरोपी हा पीडित तरुणीच्या भावाचा मेहुणा आहे.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Crime, Rape