मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /असा नराधम नवरा नकोच, लग्नानंतर एक मुलगा, सहा वर्षांनंतरही..., गोंदियातील धक्कादायक घटना

असा नराधम नवरा नकोच, लग्नानंतर एक मुलगा, सहा वर्षांनंतरही..., गोंदियातील धक्कादायक घटना

गोंदिया शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीविरोधात महिला सेलकडे तक्रार केली आहे.

गोंदिया शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीविरोधात महिला सेलकडे तक्रार केली आहे.

गोंदिया शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीविरोधात महिला सेलकडे तक्रार केली आहे.

गोंदिया, 15 मे : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे काही ठिकाणी कुटुंबियातील सदस्यांकडून महिलांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटतात. कुटुंबासाठी वेळप्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता मेहनत करतात. पण काही घरांमध्ये महिलांच्या कामांची दखल घेतली जात नाही. त्यांना महिलांच्या कामाबद्दल आणि संवेदनशील मनाची जाणीव नसते. त्यांना फक्त आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो. त्यासाठी ते आपल्या घरातील महिलांना त्रास देतात. त्यांचा मानसिक छळ करतात. तसेच मारहाणदेखील करतात. गोंदिया शहरातदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोंदिया शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीविरोधात महिला सेलकडे तक्रार केली आहे. या महिलेने कोर्टात साक्ष देऊ नये यासाठी तिच्या पतीने तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शैलेंद्र वाढई (वय 38) असं आरोपी पतीचं नाव आहे. आरोपीच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, 'वर्षा'वर खलबतं, नेमकं काय घडतंय?)

नेमकं प्रकरण काय?

पीडितेचं लग्न 25 फेब्रुवारी 2016 ला झाले होते. पीडितेला आरोपी पतीपासून एक अपत्य आहे. लग्नापासूनच पती आणि सासरचे लोक तिला त्रास देत होते. अनेक वर्ष त्रास सोसल्यानंतर अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने महिला सेलकडे तक्रार केली होती. पण महिला तक्रार निवारण केंद्रात त्यांचा समझोता न झाल्यामुळे याप्रकरणी अखेर कलम 498 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आरोपी शैलेश पत्नीला त्रास देत आहे. तो पीडितेला रस्त्यात किंवा कुठेही पकडून मारहाण करीत असल्याच्या आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणात गोंदिया शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime