Home /News /crime /

दोन प्रियकर अन् एका प्रेयसीमध्ये राडा; PUBG वर जुळलेल्या प्रेमाचा असा झाला शेवट

दोन प्रियकर अन् एका प्रेयसीमध्ये राडा; PUBG वर जुळलेल्या प्रेमाचा असा झाला शेवट

या प्रकरणानंतर दोघांचीही रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

    देहरादून, 15 मे : फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअॅपवर मैत्री आणि प्रेम झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी भागात घडली आहे. येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला आलेल्या दोन तरुणांमध्ये मारमारी झाली. त्यानंतर कळालं की, दोन्ही तरुणांसोबत एकच तरुणी प्रेमाचा खेळ खेळत होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन गेम खेळत असताना तिची मैत्री राजस्थानमधील तरुणासोबत झाली होती. त्यानंतर दोघेही एकत्रच पबजी गेम खेळत होती. यादरम्यान दोघांनी आपला मोबाइल नंबर शेअर केला आणि फोनवर बोलू लागले. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले, आणि भेटण्याचा प्लान केला. एक महिन्यापूर्वी ऑनलाइन खेळादरम्यान तरुणीचा मैत्री मुरादाबाद येथील एका तरुणासोबत झाली. या तरुणासोबतही ती प्रेमात पडली. तरुणीने मुरादाबादमधील तरुणाला भेटण्यासाठी हल्द्वानी येथे बोलावलं. शुक्रवारी दोघांना भेटायला तरुणी मल्ला गोरखपूर हल्द्वानी येथे पोहोचली. हे ही वाचा-समलैंगिक संबंधाला तरुणाचा विरोध; पुढे तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार येथे पोहोचताच दोघेही तरुणीला आपली प्रेयसी असल्याचं सांगून भांडू लागले. गोंधळ झाल्यानंतर कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस दोघांनाही ठाण्यात घेऊन गेले. येथे चौकशीदरम्यान सत्य समोर आलं. तरुणीने लगावली कानशिलात... तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावलं, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ज्यावेळी दोन्ही तरुण भांडण करीत होते, त्यावेळी तरुणीही तेथे होती. यावेळी तिने राजस्थानमधील तरुणाला कानशिलात लगावली. पबजी गेम खेळण्यात दोन्ही तरुण प्रोफेशनल लेव्हलचे खेळाडू आहेत.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Girlfriend, Pubg game

    पुढील बातम्या