ग्वाल्हेर, 16 मे : ग्वाल्हेरमध्ये
(Gwalior) एका तरुणीला अश्लील फोटोंद्वारे ब्लॅकमेल
(Blackmail) करून तिच्यासोबत गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
(Physical Abused with Young Lady) आरोपी तरुणाने मंदिरात तरुणीसोबत लग्न केल्याचे नाटक केले. तिच्यासोबत फोटोही काढले. यानंतर तिला सोबत घेऊन गुजरातला निघून गेला. इथे तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत दुष्कर्म करत राहिला. आरोपी हा पीडित तरुणीच्या भावाचा मेहुणा आहे. श्याम सिंह उर्फ आशु बघेल असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
संपूर्ण प्रकरण काय?
ग्वाल्हेरच्या महाराज पुरा ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम सिंह उर्फ आशु बघेल हा पीडित तरुणाच्या भावाचा मेहुणा आहे. तो महावीर नगर परिसरातील रहिवासी आहे. एक दिवस जेव्हा तरुणीचा भाऊ घरी नव्हता त्यादिवशी श्यामने या तरुणीचे अश्लिल फोटो काढले. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
इतकेच नव्हे तर त्याने 6 जून 2021ला एका मंदिरात बोलावून तिच्यासोबत बळजबरी करत लग्नाचे नाटक केले. तसेच फोटो काढले. यानंतर आरोपी तिला भावाच्या घरी सोडून गेला. तरुणीने सांगितले की ती, बदनामीच्या भीतीने चूप राहिली. यानंतर पुन्हा 12 फेब्रुवारी 2022ला आरोपीने तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घरी बोलावले. यानंतर आरोपी तिला ग्वाल्हेर येथून गुजरात राज्यातील सुरत येथे घेऊन गेला. सुरतमध्ये आरोपीने तरुणीसोबत अनेकदा दुष्कर्म केले.
हेही वाचा - दोन प्रियकर अन् एका प्रेयसीमध्ये राडा; PUBG वर जुळलेल्या प्रेमाचा असा झाला शेवट
याचदरम्यान, घरच्यांकडून वाढलेल्या दबावामुळे आरोपी श्याम याने पीडित तरुणीला ग्वाल्हेर येथे आणले. त्याने ग्वाल्हेर येथे येऊन तरुणीला तिच्या भावाच्या घरी सोडून दिले. परिवाराने विचारपूस केल्यावर पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या भावाने आपल्या मेहुण्याचा कारनामा पाहून महाराजपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.