Home /News /astrology /

Horoscope today: राशीनुसार निवडा तुमचे करिअर, हे आहेत सर्वोत्कृष्ट पर्याय

Horoscope today: राशीनुसार निवडा तुमचे करिअर, हे आहेत सर्वोत्कृष्ट पर्याय

आहे त्या मार्गावरुन जाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने जात तुमच्या इच्छित जीवनशैलीला अनुरुप एखादे करिअर (Career) निवडू शकता.

    मुंबई 2 जुलै: आपल्यापैकी बहुतेक लोक करिअर म्हणून पारंपरिक व्यावसायिक मार्गाचा अवलंब करतात आणि नियमित जीवनशैली (Life Style) जगत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो किंवा अनेकदा मिळतही नाही. तथापि, आहे त्या मार्गावरुन जाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने जात तुमच्या इच्छित जीवनशैलीला अनुरुप एखादे करिअर (Career) निवडू शकता. करिअरचा विचार केला तर आपण सर्वच जण व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी तळमळत असतो. यासाठी तसंच कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण रात्रंदिवस परिश्रम करत असतो. भरभक्कम बॅंक बॅलन्स, तणावमुक्त जीवनशैली, एक आलिशान प्रशस्त कार आणि चांगलं मोठ्ठं घर हे कुणाला नको असतं? मात्र हे सर्व मिळवण्याकरिता एखाद्याची कुवत आणि मर्यादा त्याला माहीत असणं आवश्यक असतं. यासाठी तुम्ही तुमच्या राशीबद्दल (Zodiac Sign) जाणून घेऊ शकता. आपलं भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. ज्योतिषाला आपली पत्रिका (Horoscope) दाखवून आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, नोकरी, करिअर, शिक्षण आदींची माहिती अनेकजण जाणून घेत असतात. चला तर मग जाणून घेऊया आपल्या राशीनुसार, आपली कुवत, सामर्थ्य आणि मर्यादांवर आधारित आपल्या करिअरचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकेल. विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स आणि व्हा यशस्वी मेष (Aries) -  मेष ही दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली रास आहे. या राशीच्या व्यक्ती शूर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. नेतृत्व करण्याची प्रतिभा या राशीच्या व्यक्तींमध्ये जन्मजात असते. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्तम व्यवस्थापक, उद्योजक, मार्केटिंग मॅनेजर आणि टूर गाईडस होऊ शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी. वृषभ (Taurus) -  या पृथ्वी तत्त्वाच्या राशीचं चिन्ह बैल आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती सातत्य राखणाऱ्या, आत्मविश्वास असलेल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी निष्ठावान असतात. परिणामी या राशीच्या व्यक्ती ब्युटी आणि फॅशन, बॅंकिंग (Banking) आणि वित्त (Finance), जीवशास्त्र (Biology) तसेच वनस्पतीशास्त्र या क्षेत्रांमध्ये प्रगती करु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : फॅशन डिझायनर डोनाटेला वर्सासे. भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स आणि मेडिकलच्या पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय मिथुन (Gemini) -  परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि साधं असं व्यक्तिमत्व मिथुन राशीच्या व्यक्तींचं असतं. या राशीच्या व्यक्तींचा संचार एखाद्या फुलपाखराप्रमाणे असतो. अनेकदा या राशीच्या व्यक्ती तुम्हाला पार्टीजमध्ये, मार्गदर्शन करताना किंवा प्रवास करताना दिसून येतील. या राशीच्या लोकांसाठी शिक्षक (Teacher), लेखक (Writer), टूर गाईडस (Tour Guide) आणि कार्यक्रम संयोजक हे करिअर ऑप्शन अधिक लाभदायक ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : लेखक सलमान रश्दी कर्क (Cancer) -  जलतत्त्व असणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा दयाळू, चंचल आणि उत्साही असतात. तसंच त्या खूप मोहक किंवा आकर्षकदेखील असतात. इतरांच्या भावनिक गरजा समजून घेण्याची विलक्षण क्षमता या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते. जमिन खरेदी–विक्री (Land Deals), खासगी शेफ, इंटेरिअर डिझायनर (Interior Designer) आणि सोशल वर्कर (Social Worker) हे या व्यक्तींसाठी चांगले करिअर ऑप्शन्स ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : ऑस्ट्रियन शेफ वोल्फगॅंग पुक सिंह (Leo) -  या राशीच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व एखाद्या अग्निज्वाळेप्रमाणे उबदार, तापट, चैतन्यमय असते. ऊर्जा आणि आशावाद ही यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहेत. एखादा प्रकल्प जर मनापासून आवडला तर या व्यक्ती त्यात झोकून देत काम करतात आणि त्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अभिनय (Acting), कार्यक्रम संयोजक (Event Manager), प्रशिक्षक (Instructor) किंवा डिझायनर (Designer) हे करिअरचे चांगले पर्याय ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ कन्या (Virgo) -  पृथ्वी तत्त्व असलेल्या कन्या राशीच्या व्यक्ती या इतरांसाठी फायदेशीर ठरु शकतात. या व्यक्तींकडे परिपूर्णता हा गुणधर्म असतो, त्यामुळे ते कोणत्याही व्यवसायात स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम करतात. चिकित्सक दृष्टिकोनामुळे अकाउंटंट (Accountant), संपादक (Editor), वैज्ञानिक (Scientist), संशोधक (Researcher) किंवा शिक्षक म्हणून करिअरसाठी या व्यक्ती आदर्श उमेदवार ठरतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे तूळ (Libra) -  इतर व्यक्तींना मदत करण्याची, नातेसंबंधांचा विकास करण्याची, न्याय्य भूमिका जपण्याची किंवा संरक्षित ठेवण्याची जिथे गरज असते, अशा जागेवर तूळ राशीच्या व्यक्ती असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी मनुष्यबळ व्यवस्थापक (Human Resource Manager), गुप्तहेर (Detective), वकील (Lawyer) किंवा सल्लागार (Consultant) हे करिअरचे पर्याय उत्तम ठरतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : वकील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी वृश्चिक (Scorpio) -  वृश्चिक राशीच्या व्यक्ती नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी तसंच कौशल्यं संपादन करण्यासाठी आतूर असतात. यामुळेच त्यांची भरभऱाट होत असते. त्यामुळे त्यांना करिअरसाठी संशोधक (Researcher), अभियंता (Engineer), अर्थिक सल्लागार (Financial Advisor), बाजार विश्लेषक हे चांगले पर्याय ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : ॲपल कंपनीचे सीईओ आणि अभियंता टिम कुक. धनु (Sagittarius) -  धर्नुधारी चिन्ह असलेल्या या राशीच्या व्यक्ती चंचल आणि नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अधीर असतात. त्यामुळे रोजगाराचा विचार करता या व्यक्ती रुचीपूर्ण, रोमांचक आणि नित्यनूतन गोष्टी घडू शकतात अशा कुठल्याही करिअरसाठी योग्य ठरतात. या व्यक्तींकरिता करिअरसाठी आर्किटेक्ट (Architect), शिक्षक (Teacher), ट्रॅव्हल एजंट (Travel Agent) किंवा हॉस्पिटॅलिटी वर्कर (Hospitality Worker) हे उत्तम पर्याय ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : सायन्स कम्युनिकेटर बिल नेयी. मकर (Capricorn) -  मकर राशीच्या व्यक्ती पैसे आणि वेळेचे व्यवस्थापन याला अधिक महत्त्व देतात. यांची बुद्धी चौकस असते. या व्यक्तींमध्ये व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये उपजतच असतात. त्यामुळे करिअरसाठी वित्त (Finance), व्यवस्थापन (Management), बॅंकिंग (Banking), अकाउंटिंग (Accounting), कायदा आणि प्रशासन (Administration) हे या व्यक्तींकरिता चांगले मार्ग ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी कुंभ (Aquarius) -  कुंभ राशीचे लोक पराकोटीचे जिज्ञासू, नाविन्याचा ध्यास असलेले आणि महान मानवतावादी असतात. जीवनात पुढे काय करायचे याबाबत त्यांच्या मनात अनिश्चितता असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षितता नसते आणि त्यांना तेच आवडतं. डिझाईनर (Designer), एरोनॉटिकल (Aeronautical), ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्सेस (Astronomical Science) आणि सोशल वर्कर हे करिअरचे ऑप्शन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : सामाजिक कार्यकर्ते विनोबा भावे मीन (Pisces) -  मीन राशीच्या व्यक्ती काल्पनिक जगात रमणाऱ्या असतात. सर्व राशींमध्ये निरागस रास म्हणजे मीन रास. या राशीच्या व्यक्ती प्रचंड श्रध्दावान आणि विश्वासाची ताकद असलेल्या असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्तम कलाकार (Artists), शिक्षक (Educator), समुपदेशक (Counsellor), मानसशास्त्रज्ञ (Psychiatrist) आणि ज्योतिषी (Astrologer) होऊ शकतात. फॉलो करण्यासाठी उदाहरण : कलाकार मायकेल अँजेलो निष्कर्ष - करिअर हॉरोस्कोप म्हणजे पत्रिकेनुसार करिअर ठरवणं ही नोकरीच्या शोधासाठी सर्वात विश्वासार्ह किंवा तर्कसंगत पध्दत नाही. जर तुम्ही ज्योतिषाच्या माध्यमातून सल्ला घेतला तर त्यामधून तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमच्या करिअरची उदिदष्टे याबाबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते. जे तुमच्यासाठी कदाचित फायदेशीर देखील ठरु शकते.
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs

    पुढील बातम्या