मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Money Mantra: आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी 'या' राशींनी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं उत्तम राहील

Money Mantra: आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी 'या' राशींनी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं उत्तम राहील

31 मार्चचे आर्थिक राशिभविष्य

31 मार्चचे आर्थिक राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (31 मार्च 2023) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचं सर्वोच्च स्थान कायम राहील. मार्केटिंग आणि मीडियाशी निगडित कामांपासून दूर राहा. नफ्याच्या संधी सध्या दार ठोठावत आहेत. या सकारात्मक परिस्थितीचा योग्य उपयोग करून घ्या.

उपाय : श्री हनुमानाला शेंदूर अर्पण करा.

वृषभ (Taurus) : बिझनेस पेपर्स आणि फाइल्सच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. कदाचित चौकशी होऊ शकते. सध्या तुमच्या कामाबद्दल अधिक विचार करण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये नव्या प्रोजेक्टवर काम करावं लागण्याची शक्यता आहे.

उपाय : सरस्वतीमातेची आराधना/पूजा करा.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी काही समस्या आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं उत्तम राहील. सध्या आर्थिक परिस्थिती नॉर्मल असेल. नोकरदार व्यक्तींवर कामाचा अतिरिक्त ताण येईल.

उपाय : योगासनं, प्राणायाम करा.

कर्क (Cancer) : बिझनेसशी संबंधित जनसंपर्क मजबूत होण्यावर लक्ष केंद्रित करा आणि सूत्रांशी संपर्क साधा. मोठी ऑर्डर मिळू शकेल. पार्टनरशिप बिझनेसमध्ये तुम्हालाच बहुतांश निर्णय घ्यावे लागतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनी त्यांच्या सीनिअर्समध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नये.

उपाय : शिवचालिसा पठण करा.

सिंह (Leo) : मार्केटिंगशी निगडित काम किंवा कोणत्याही प्रकारचा ऑफिशियल प्रवास पुढे ढकला. मशिनरी आणि मोटर पार्ट्सशी निगडित बिझनेसमध्ये उत्तम ऑर्डर्स मिळतील. कोणाला तरी पैसे उधार देणं घातक ठरू शकतं. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.

कन्या (Virgo) : बिझनेसची कामं पूर्ण करण्यात काही अडथळे येतील. या वेळी तुमच्या कार्यपद्धतीत काही बदल करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी कौटुंबिक टेन्शनचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. मार्केटिंगशी निगडित कामाकडे विशेष लक्ष द्या.

उपाय : भगवान गणेशाची आराधना/पूजा करा.

तूळ (Libra) : सध्या बिझनेस अ‍ॅक्टव्हिटीजमध्ये अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. कामाच्या दर्जाकडे अधिक लक्ष द्या. टॅक्सशी संबंधित सर्व कागदपत्रं पूर्ण ठेवा. कारण निष्काळजीपणामुळे काही समस्या उद्भवू शकतात.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

वृश्चिक (Scorpio) : तुम्ही काही काळ बिझनेसचं काम खूप कष्ट घेऊन करत आहात. आज त्याचे सकारात्मक रिझल्ट्स मिळतील. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन आणि सहकार्य यांचा तुम्हाला कामामध्ये उपयोग होईल; मात्र आता कोणतेही नवे प्लॅन्स करण्यासाठी योग्य काळ नाही. केवळ सध्याच्या अ‍ॅक्टिव्हिटीजवरच लक्ष ठेवा.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

हे वाचा - मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब

धनु (Sagittarius) : या काळात बिझनेसकडे दुर्लक्ष करू नका. तोटा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. पार्टनरशिप बिझनेसमध्ये पारदर्शकता ठेवा. गैरसमजांमुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होईल. तुमच्या बिझनेसवर जास्त पैसे खर्च करू नका. सध्या काळ अनुकूल नाही.

उपाय : गायीला हिरवा चारा खाऊ घाला.

मकर (Capricorn) : बिझनेसच्या कामात इतरांना फॉलो करण्यापेक्षा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण तुम्हाला कदाचित अन्य कोणाच्या तरी चुकीचे परिणाम भोगावे लागतील. फाइल्स आणि डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये सुरक्षित ठेवा.

उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

हे वाचा - हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?

कुंभ (Aquarius) :

प्रॉपर्टी किंवा कोणत्याही विशिष्ट कामाशी संबंधित डील्स करताना तुम्हाला काळजी घ्यायला हवी. विश्वासघात किंवा फसवणुकीची शक्यता आहे. ऑर्डर्स थांबवल्यामुळे तोटा होऊ शकतो. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेणं उत्तम राहील.

उपाय : भगवान गणेशाची पूजा/आराधना करा.

मीन (Pisces) : ग्रहांचं राश्यंतर अनुकूल राहील. पब्लिक डीलिंग, माध्यम, मार्केटिंग यांसारखे बिझनेस आज फायद्याच्या स्थितीत असतील. मोठ्या वर्कलोडमुळे वैयक्तिक कामं पुढे ढकलावी लागतील. ऑफिसचं कामही घरी करावं लागेल.

उपाय : योगासनं, प्राणायाम करा.

First published:
top videos

    Tags: Money, Rashibhavishya, Rashichakra