गरिमा- या सिद्धीच्या साहाय्याने हनुमान स्वतःचे वजन मोठ्या पर्वतासारखे वजनदार करू शकत होते. ही सिद्धी महाभारत काळात हनुमानाने भीमासमोर वापरली होती. जेव्हा भीमाला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला. तेव्हा हनुमानाने म्हातार्या माकडाचे रूप धारण केले आणि भीमाचा गर्व मोडण्यासाठी वाटेत शेपूट पसरवली. भीमाने हनुमानाची शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला पण ती शेपूट त्याला उचलता आली नाही, त्यामुळे भीमचा गर्व/अभिमान चकनाचूर झाला.
प्राकाम्य- या सिद्धीच्या मदतीने हनुमानजी कुठेही जाऊ शकतात. आकाशात ऊंच झेप घेऊ शकत होते आणि हवे तितके दिवस पाण्यात जिवंत राहू शकत होते. या सिद्धीमुळे हनुमान कायम तरुण राहू शकतात. या सिद्धीद्वारेच हनुमान आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकतो. रामचरितमानसमध्ये, हनुमान सुग्रीवांच्या सांगण्यावरून ब्राह्मणाच्या रूपात प्रभू रामाला भेटले.
वशित्व- या सिद्धीमुळे हनुमान जितेंद्रिय आहेत आणि आपल्या मनावर-भावनेवर नियंत्रण ठेवू शकतात. वशित्व सिद्धीमुळे हनुमान कोणत्याही जीव-प्राण्याला वश करून ठेवू शकतात. या प्रभावांमुळेच हनुमान अतुलित बलधाम आहे. अशा या अष्टसिद्धी असलेला हनुमान या सिद्धींचा दाता होईल ("अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता"), असे आशीर्वाद त्याला जानकी मातेने दिले होते. म्हणजे हनुमान आपल्या भक्तांना या सिद्धींचे वरदान देऊ शकतात.