मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /तुम्ही वाट पाहत असलेला महत्त्वाचा निर्णय आज होऊ शकतो; कसा असेल 28 मार्चचा दिवस?

तुम्ही वाट पाहत असलेला महत्त्वाचा निर्णय आज होऊ शकतो; कसा असेल 28 मार्चचा दिवस?

28 मार्च 2023 राशीभविष्य

28 मार्च 2023 राशीभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) 

काही प्रभावी व्यक्तिमत्त्वांसोबत तुमचे विचार जुळण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही जणांना होमसिकनेस जाणवत असेल, तर घरी जाण्याचं नियोजन करण्याची किंवा घरून कोणाला तरी बोलावण्याची ही वेळ आहे. तुम्ही वाट पाहत असलेला कार्यक्रम काही कालावधीत होण्याची शक्यता आहे; मात्र तो वेगळ्या स्वरूपात होईल.

LUCKY SIGN - An jade plant

वृषभ (Taurus) 

तुम्हाला आज अधिक फ्लेक्झिबल वाटेल. तुमच्या जोडीदाराला भावनिकदृष्ट्या गळून गेल्यासारखं वाटेल आणि त्यांना तुमच्या सोबतीची गरज आहे. वेळेचा अपव्यय करणं टाळा. कारण तुमच्या कामात अनपेक्षित अडथळे येऊ शकतात.

LUCKY SIGN - A salt lamp

मिथुन (Gemini)

अलीकडच्या ट्रिपमुळे तुम्हाला नव्या बिझनेस आयडियाजची प्रेरणा मिळू शकते. तुमच्या जुन्या संपर्कातल्या व्यक्तींसोबत तुम्ही नेटवर्किंग सुरू करू शकता. एखाद्या अचानक समोर आलेल्या आव्हानामुळे बिझी व्हाल.

LUCKY SIGN - A cobalt blue box

कर्क (Cancer) 

तुम्ही आधी केलेलं काम आता इतरांना अधिक आकर्षक वाटू लागेल. तुम्हाला तुमच्या काही कौशल्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. तुम्हाला घरी अतिरिक्त Niche Space ची गरज वाटत असेल, तर ती तुम्ही आता करू शकता.

LUCKY SIGN - A peacock

सिंह (Leo)

देणगी देण्याची किंवा अन्य व्यक्तींना मदतीचा हात पुढे करण्याची संधी तुमच्यापुढे चालून येईल. घरी काही वादविवाद झाले, तर ते सोडून द्या. तुमची मुलं तुमच्यासाठी काही युनिक प्लॅन करत असण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A sports event

कन्या (Virgo)

प्रॅक्टिकल असण्याचे काही तोटेही असतात. तुमच्या अ‍ॅटिट्यूडमुळे तुमच्या जवळची एखादी व्यक्ती थोडी मागे जाईल. करता येण्यासारख्या कामांची यादी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ऊर्जा तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही ती कामं पूर्णही करू शकाल, अशी शक्यता आहे.

LUCKY SIGN - Your favorite film

हे वाचा - दारात तुळशीजवळ या वस्तू असतील तर घरात कशी नांदेल लक्ष्मी? वास्तु नियम समजून घ्या

तूळ (Libra)

अकारण भीतीपासून सुटका ही आजच्या दिवसाची अचीव्हमेंट असू शकते. त्या भीतीमुळे तुम्ही बराच काळ चिंतेत असण्याची शक्यता आहे. तुम्ही टाळत असलेल्या कोणाला तरी भेटण्याची तीव्र इच्छा तुम्हाला होत आहे. किरकोळ रॅशेस किंवा स्किन अ‍ॅलर्जीमुळे थोडासा त्रास होऊ शकतो.

LUCKY SIGN - A clear crystal

वृश्चिक (Scorpio)

तुमच्याबद्दल काही अफवा सर्वत्र फिरत आहेत. तुम्हालाही त्या ऐकू येतील. एखादं नवं प्रपोझल, जे यापूर्वी अजिबात इंटरेस्टिंग वाटलं नव्हतं, ते अचानक आकर्षक वाटू लागेल. तुमचे आई-वडील एखाद्या तातडीच्या मुद्द्यावर तुमच्याशी गांभीर्याने चर्चा करण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A jute bag

हे वाचा - या झाडांमध्ये असतो देवी-देवतांचा वास! आपल्या हातून होऊ नये त्यांची अवहेलना

धनु (Sagittarius) 

तुम्ही जुन्या संपर्कातल्या एखाद्या व्यक्तीशी पुन्हा जोडलं जाण्याचा विचार करत असाल, तर ते आज करू शकाल. कंटाळवाण्या रूटीनमध्ये तुम्हाला नवी ऊर्जा मिळू शकेल. आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. वेलनेस रूटीनसाठी एखाद्या तज्ज्ञाशी चर्चा करू शकता.

LUCKY SIGN - A new craft

मकर (Capricorn)

प्रत्येक दिवशी ताजेपणाने सुरुवात करावीशी वाटेलच असं नाही. आजचा तुमचा दिवस संथ असू शकेल. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीचा रिव्ह्यू घेण्याच्या मनःस्थितीत तुम्ही असाल. आजचा दिवस दृष्टिकोन बदण्याचा आहे.

LUCKY SIGN - A colorful scarf

कुंभ (Aquarius)

तुम्हाला रिलॅक्स वाटेल. स्वतःचे लाड करण्यासाठी काही वेलनेस अ‍ॅक्टिव्हिटीज करण्याकरिता आजचा दिवस चांगला आहे. हे मित्रासोबत करण्याच्या कल्पनेवरही तुम्ही विचार करून पाहू शकता. कोणाला कर्जासाठी विचारण्याकरिता आत्ताचा कालावधी योग्य नाही.

LUCKY SIGN - A kettle

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

मीन (Pisces)

तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रतिसादासाठी वाट पाहत असाल, तर त्याबाबत निराशा होऊ शकते. बदलत्या परिस्थितीत तुम्हाला नेमकं काय हवं आहे, याकडे तुम्हाला पुन्हा एकदा पाहावं लागेल. एखाद्या अनपेक्षित फोनकॉलमुळे तुमचा दिवस चांगला जाईल. अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला अधिक संयम दाखवण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A synchronized number plate

First published:
top videos

    Tags: Rashibhavishya, Rashichakra