- जमीन पुसताना वास्तुशास्त्रानुसार, जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसांपासून थांबली असेल, तर घर स्वच्छ करताना पाण्यात थोडे मीठ टाका. हे काम तुम्ही रोजच करावे असे नाही. तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाही करू शकता. वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की, घरात मिठाच्या पाण्याचा पोछा लावल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते. यासोबतच मिठाचा पोछा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
- बाळाला आंघोळ घालताना लहान मुलांना दृष्ट लागण्यापासून वाचवण्यासाठी वास्तुशास्त्रात मीठाचे उपाय सांगितले आहेत. यानुसार आठवड्यातून एकदा पाण्यात चिमूटभर मीठ टाकून लहान मुलांना आंघोळ घालू शकता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने मुलांमध्ये अॅलर्जी संबंधित आजारही होत नाहीत.
जुनाट आजारांवर उपाय - जर तुमच्या घरातील कोणी दीर्घकाळ आजाराने त्रस्त असेल तर तुम्ही मीठाचा उपाय करू शकता. यासाठी एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि रोगाने पीडित व्यक्तीच्या डोक्याशेजारी ठेवून द्या. ते मीठ आठवड्यातून एकदा बदला आणि पुन्हा नवीन मीठ घाला. असे केल्याने त्या व्यक्तीचे आरोग्य हळूहळू सुधारताना दिसेल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)