नवी दिल्ली, 06 जून : ज्योतिषशास्त्रमध्ये (Astrology) जन्मतारखेला अतिशय महत्त्व आहे. ज्या लोकांचा जन्म 12 तारखेला झालेला असतो. त्यांच्यावर गुरू ग्रहाची विशेष कृपा पाहायला मिळते. हे लोक साहसी असतात आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. 12 तारखेला जन्मलेले लोक स्पष्ट वक्ते असतात. आपल्या कामाबद्दल देखील खूप जागृत असतात. अतिशय शिस्तप्रिय आणि काम करताना कोणतीही तडजोड करत नाहीत. कामातला हलगर्जीपणा त्यांना सहन होत नाही आणि त्यामुळेच अनेक लोकं त्याचे विरोधक बनतात. जाणून घेऊयात 12 तारखेचा जन्मलेल्या लोकांच्या खास गोष्टी.
12 तारखेला जन्मलेले लोक अतिशय रोमँटिक (Romantic) असतात त्यांना परफेक्ट पार्टनर (Perfect Pattern) देखील मिळतो. मात्र, प्रेमाच्या बाबतीत मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात. ते प्रेमाच्या बाबतीत अतिशय लकी असतात.
त्यांना चांगल्या जोडीदारसाठी जास्त शोधाशोध करावी लागत नाही. या तारखेला जन्मलेले लोक नात्यांना खूप महत्त्व देतात.
हे वाचा - साधा चहा नकोच, Diabetes कंट्रोलसाठी हे स्पेशल चहा घ्यायला सुरुवात करा
करियर
12 तारखेला जन्मलेले लोक अभिनय, शिक्षकी पेशा,पत्रकारिता, काउन्सलिंग अशा क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करतात. नोकरी-व्यवसायाच्या बाबतीतही ते भाग्यवान असतात. आत्मविश्वास, धैर्यशील आणि शांत चित्ताचे असल्यामुळे ते प्रत्येत कामात यश मिळवतात.
हे वाचा - शरीरातील नसांचं कार्य सुरळीत ठेवतात या 5 गोष्टी; आहारात घ्यायला विसरू नका
12 तारखेला जन्मलेल्या लोकांचा लकी नंबर 3 असतो. तर, लकी रंग पिवळा आणि गुलाबी असतो. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार त्यांच्यासाठी अतिशय शुभ मानले जातात. याशिवाय जानेवारी आणि जुलै महिन्यात त्यांना जास्त लाभ मिळतो. त्यामुळे मोठ लक्ष गाठण्यासठृ प्रचंड मेहनत करून पुढे जावं.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.