मुंबई, 18 डिसेंबर : सध्याच्या काळात फ्लर्टिंग (Flirting) म्हणजे अनेकांना कौशल्यच वाटतं. कारण प्रत्येकाला फ्लर्ट करणं जमत नाही. तसंच फ्लर्ट करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला न दुखवता त्यांच्या मनात तुमच्याविषयी भावना निर्माण करता. काही मुले तर फ्लर्ट करण्यात एकदम एक्सपर्ट असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीवर मुली फिदा होतात. ही मुले प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतात. ज्योतिषानुसार या 5 राशींची मुलं ही फ्लर्ट करण्यात तरबेज असतात, तर जाणून घेऊया या राशींविषयी. ‘ झी न्यूज हिंदी ’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तुळ (Libra) या राशीच्या मुलांचा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा असतो. या राशीची मुलं खूपच आकर्षक असतात. तसंच त्यांच्यात आत्मविश्वास पूर्णपणे असतो. त्यांच्या याच गुणामुळे मुलींना या राशीची मुलं आवडतात. शिवाय, त्यांची बोलण्याची शैली कुणालाही पटवण्यासाठी पुरेशी आहे. या राशीची मुलं फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. फ्लर्ट करण्यात कन्या (Virgo) राशीच्या मुलांचा हात कोणीच धरू शकत नाही. या राशीच्या मुलांची खास गोष्ट म्हणजे, ते प्रत्येक मुलीसोबत फ्लर्ट करत नाहीत. या मुलांचं व्यक्तिमत्व आकर्षक व चार्मिंग असतं. ते एखादी व्यक्ती मनापासून आवडल्यासच फ्लर्ट करतात. याशिवाय ते आपल्या जोडीदाराची चांगली साथ निभावतात. हे वाचा - लग्नसराईला ब्रेक! खरमास सुरू; पाहा 2022 मधील विवाह मुहूर्त सिंह (Leo) राशीच्या मुलांचं व्यक्तिमत्व दमदार असतं. यामुळे प्रत्येक मुलगी त्यांच्याकडे आकर्षित होते. या राशीच्या मुलांना आपला जोडीदार बनवण्यासाठी मुली उत्सुक असतात. या मुलांची बोलण्याची पद्धतच मुलींना आपल्याकडे खेचण्यासाठी पुरेशी असते. तसंच या राशीची मुलं आपल्या जोडीदारासोबत खूप प्रामाणिक असतात. मिथुन (Gemini) राशीची मुलं आकर्षक असतात. तसेच ते कोणाशीही अगदी सहज फ्लर्ट करू शकतात. तसंच या राशीची मुलं एखाद्या व्यक्तीसोबत नाते जोडल्यानंतर पूर्ण निष्ठेने निभावतात. एकूणच या राशीची मुलं चांगले जीवनसाथी सिद्ध होतात. जर तुमचा जोडीदार या राशीचा असेल तर तुम्ही त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकता. मेष (Aries) या राशीची मुले फ्लर्टिंगमध्ये फारच उत्तम असतात. ही मुलं कोणाचंही लक्ष स्वतःकडे वळवून घेतात. पण, मेष राशीची मुलं प्रेमाला गांभीर्याने घेत नाहीत. तसंच त्यांच्या एकाचवेळी अनेक गर्लफ्रेंडही असू शकतात. या राशीच्या मुलांची फ्लर्ट करण्याची पद्धत खूप वेगळी असते. तरीही मुली त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. म्हणूनच या राशीतील मुलांच्या प्रेमात पडताना काळजी घेतली पाहिजे. हे वाचा - तुमच्या बेडरुमध्येही आरसा आहे? या ठिकाणी लावल्यास असा होऊ शकतो परिणाम तुम्हाला हे माहीत झाल्यावर तुम्ही अधिक सावध रहाल. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.