जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नसराईला लागणार ब्रेक! आजपासून खरमास होतोय सुरू; पाहा 2022 मधील विवाह मुहूर्त

लग्नसराईला लागणार ब्रेक! आजपासून खरमास होतोय सुरू; पाहा 2022 मधील विवाह मुहूर्त

kharmas 2021

kharmas 2021

आज (16 डिसेंबर 21) सूर्याच्या धनु संक्रांतीसह खरमास आरंभ (Kharmas) होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला ब्रेक लागणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     नवी दिल्ली, 16 डिसेंबर:  आज (16 डिसेंबर 21) सूर्याच्या धनु संक्रांतीसह खरमास आरंभ (Kharmas) होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला ब्रेक लागणार आहे. हिंदू पंचांगानुसार खरमासादरम्यान, म्हणजे इथून पुढे एक महिना लग्न, मुंडन, गृहप्रवेश अशी शुभकार्ये करता येत नाहीत. 16 डिसेंबर ते 14 जानेवारी असा खरमासाचा कालावधी असणार (Kharmas 2021 duration) आहे. 22 जानेवारीला मकर संक्रांतीसोबत (Makar Sankranti) खरमास संपेल. त्यामुळे आता कोणतेही शुभकार्य करण्यासाठी थेट पुढचे वर्ष (Wedding Muhurta in 2022) सुरू होण्याची वाट बघावी लागणार आहे. खरमासामध्ये सूर्य अगदी धीम्या गतीने चाल करत असतो, तसेच गुरूचा प्रभावही अगदी कमी असतो. त्यामुळे या महिन्यात शुभकार्य टाळण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात, यामुळे चिंता करण्याची गरज नाही. 2022 मध्ये विवाहाचे भरपूर मुहूर्त (2022 Vivah Muhurta) आहेत. यातील सर्वात कमी मुहूर्त जानेवारीमध्ये, तर सर्वाधिक मुहूर्त जुलै-ऑगस्टमध्ये आहेत. जानेवारीमध्ये मकर संक्रांत 22 तारखेला असल्यामुळे केवळ चार विवाह मुहूर्त आहेत.

    2022 मध्ये असणारे विवाह मुहूर्त

    येत्या जानेवारीमध्ये (January 2022 Wedding Muhurta) केवळ चार विवाह मुहूर्त आहेत. 22, 23, 24 आणि 25 या तारखांना हे विवाह मुहूर्त असणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एकूण आठ विवाह मुहूर्त आहेत. फेब्रुवारीच्या 5,6,7,9,10,18,19 आणि 20 तारखेला विवाहाचे शुभ मुहूर्त (February 2022 Vivah Muhurta) असणार आहेत. मार्च महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाहीये. तर एप्रिलमध्ये एकूण नऊ विवाह मुहूर्त आहेत. एप्रिलच्या 15,16, 19, 20, 21,22, 23, 24 आणि 27 या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. मे आणि जून महिन्यात अनुक्रमे 15 आणि 10 दिवस विवाह मुहूर्त असणार आहेत. मे महिन्यातील 2, 3, 4, 9, 10, 11,12, 16,17,18, 20, 21, 26, 27 आणि 31 या तारखांना विवाह मुहूर्त आहे. तर, जूनमधील 6, 8, 10,11,13, 20,21, 23 आणि 24 या तारखा विवाह कार्यासाठी शुभ आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये वर्षातील सर्वाधिक, म्हणजे प्रत्येकी 17 विवाह मुहूर्त आहेत. जुलै महिन्यातील 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 14, 18, 19, 20, 21, 23, 24, 25, 30 आणि 31 या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. तर, ऑगस्टमधील 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 14, 15, 19, 20, 21, 28, 29, 30 आणि 31 तारखांना विवाहासाठी शुभ मुहूर्त असणार आहेत. एकंदरीत हे दोन्ही महिने अत्यंत धूमधडाक्याचे असतील. सप्टेंबरमध्ये लग्नासाठी 8 मुहूर्त आहेत. 1, 4, 5, 6, 7, 8, 26 आणि 27 सप्टेंबर या दिवशी हे मुहूर्त असणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये लग्नाचा एकही मुहूर्त नाहीये. वर्षाअखेरीस डिसेंबर महिन्यात 2, 4, 7, 8, 9 आणि 14 या तारखांना विवाहाचे मुहूर्त असणार आहेत. त्यामुळे आत्ता खरमासामुळे जरी विवाह सोहळ्यांना ब्रेक लागणार असला, तरी येत्या वर्षात लग्नाच्या भरपूर संधी मिळणार आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात