नवी दिल्ली, 15 डिसेंबर : आरसा (Mirror) नाही असं एकही घर आपल्याला दिसणार नाही. अगदी छोटीशी झोपडी असो किंवा राजमहाल आरसा हा असतोच. प्रत्येक घरात छोटा का होईना आरसा असतोच. आपल्या देशात आरसे महाल (Mirror Palace) असल्याचे आपल्याला माहित आहेच. काही ठिकाणी विशेषतः राजस्थान, सौराष्ट्र या भागात घरांची सजावट आरशांच्या तुकड्यांनी केली जाते. त्यामुळे या घरांचे सौंदर्य आणखी खुलून येतं. स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठी व्यक्ती प्रत्येकाला आरसाच त्याची छबी दाखवतो. आरसाच सौंदर्याचे प्रतिबिंब दाखवतो. आरशाशिवाय आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक मिळणं कठीण आहे. माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची जागा असणाऱ्या या आरशाचा वापर घराची सजावट (Home Decoration) करण्यासाठीही करतात. कारण आरशामुळे जागा अधिक मोठी असल्याचा भास निर्माण होतो. आरशामुळे उजेडात घराचं सौंदर्य खुलतं. त्यामुळे वास्तुशास्त्रातही (Vastu Shastra) आरशाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील आरसा (Mirror in Home) योग्य ठिकाणी नसेल, तर त्याचा घरातील सदस्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. घरातील आरसा वास्तुनुसार असेल, तर घराच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येत नाहीत. त्यामुळे घरात आरसा लावताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक घरात बेडरूममध्ये (Bedroom) आरसा असतोच. मात्र वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा कुठे असावा, याबाबत माहिती घेणं आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी आरसा लावल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. घरातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरसा लावताना योग्य दिशा, जागा कोणती याची माहिती घेऊन तो त्या ठिकाणी लावणं गरजेचे आहे. जाणून घ्या, बेडरूममध्ये कोणत्या ठिकाणी आरसा लावणं चांगलं असतं.
Vastu Tips: या गोष्टींमुळे वाढू शकतात तुमच्या अडचणी, कुटुंबाच्या प्रगतीत येऊ शकतात अडथळे
वास्तुशास्त्रानुसार बेडरूमध्ये कधीही आरसा पलंगाच्या (Bed)अगदी समोर ठेवू नये. अशा पद्धतीने आरसा लावला असल्यास तो काढणं योग्य ठरेल. असा पलंगासमोरचा आरसा आयुष्य कमी करतो. याशिवाय ड्रेसिंग टेबलवरील आरसा बेडरूमच्या खिडकी (Window) किंवा दरवाजासमोर (Door)लावू नये. कारण बाहेरील प्रकाशाशी टक्कर होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील लोकांवर वाईट परिणाम होतो. बेडरूममध्ये दरवाजाच्या आतल्या बाजूला आरसा लावणंदेखील वास्तूच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. अशा जागी आरसा लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे घराची प्रगती होऊ शकत नाही. वास्तूनुसार खोलीचा दरवाजा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर आरसा लावता येतो. याशिवाय घरामध्ये दक्षिण आणि पश्चिम दिशेला आरसा लावू नये, कारण त्यामुळे कलह किंवा त्रास वाढतो. बेडरूममध्ये कोणताही आरसा लावताना विशेष काळजी घ्यावी. खोलीत आरसा अशा प्रकारे लावावा की झोपताना शरीराचा कोणताही भाग आरशात दिसणार नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या (Health Problems) वाढण्याचा धोका असतो.
2022 मध्ये शनीचा राशिबदल; ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा होणार
आरसा नेहमी उत्तर (North) किंवा पूर्व दिशेला (East) लावावा. घरामध्ये या दिशेला आरसा लावणं शुभ मानलं जातं. याशिवाय आरसा खूप मोठा नसावा. घरामध्ये गोल आकार वगळता कोणत्याही आकाराचा आरसा लावता येतो. घरात कधीही धारदार, तुटलेला आरसा ठेवू नये. यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतो, आणि त्याचा परिणाम घरातील लोकांवर होतो. त्यामुळे आरसा लावताना या सर्व निकषांचा विचार करून योग्य त्या दिशेला आरसा लावावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही. उलट सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील, त्यांची प्रगती होईल.