मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: नागपंचमी, जिवती पूजन आणि नवपंचम योग... तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

राशीभविष्य: नागपंचमी, जिवती पूजन आणि नवपंचम योग... तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

आज दिनांक 13 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध पंचमी. म्हणजेच नागपंचमी. आज जिवती पूजनही आहे. कुठल्या राशींसाठी आजचा नवपंचम योग ठरणार भाग्याचा?

आज दिनांक 13 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध पंचमी. म्हणजेच नागपंचमी. आज जिवती पूजनही आहे. कुठल्या राशींसाठी आजचा नवपंचम योग ठरणार भाग्याचा?

आज दिनांक 13 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध पंचमी. म्हणजेच नागपंचमी. आज जिवती पूजनही आहे. कुठल्या राशींसाठी आजचा नवपंचम योग ठरणार भाग्याचा?

आज चंद्र दिवसभर तुला राशीतून भ्रमण करणार असुन गुरूशी नवपंचम योग करीत आहे.

मेष

आज दिवसभर मन प्रफुल्लित राहील. जोडीने खरेदी  किंवा काही धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. दिवस शुभ आहे.

वृषभ

दिवस थोडा संथ, हुरहुर लावणारा आहे. थकवा वाटेल. आराम करावा. शुक्र संतती साठी काही खर्च करायला लावेल. दिवस बरा.

मिथुन

आज पुजा ,करून आनंदाचा उत्सव साजरा होईल. संतती साठी शुभ दिवस. काही वाचन किंवा अभ्यास कराल. दिवस चांगला जाईल.

कर्क

राशीच्या चतुर्थ स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल असून घरांमधे विशेष पूजा केल्या जाईल. आर्थिक स्थिती ठीक. दिवस चांगला जाईल.

सिंह

तृतीय चंद्र  आणि भाग्यात गुरू  उत्तम योग आहे. प्रवास सफल होतील. चर्चा, संभाषण यश देईल. बंधू भेट होईल. दिवस शुभ.

कन्या

आर्थिक लाभ संभवतात. गुरु उपासना नोकरीत उत्तम संधी मिळवुन देईल. कायदा पाळा. व्यय  स्थानात मंगळ  खर्चात वाढ करेल. दिवस बरा.

तुला

राशीतील चंद्र आज धार्मिक कामात यश देईल.  मित्र मैत्रिणींसोबत मौज कराल. व्यय स्थानात शुक्र चैनीच्या गोष्टीवर खर्च करायला लावेल. जपुन रहा.

वृश्चिक

आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक प्रगती आणि त्यासाठी खर्च दाखवित आहे. मित्र मैत्रिणींना भेटून आनंद होईल. दिवस मध्यम जाईल

धनु

आज लाभ स्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल असून आर्थिक भरभराट करणार आहेत. नवीन वस्तूची खरेदी नक्की होणार. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन संधी मिळतील.

मकर

कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी ओळख करून काही तरी  उपयोग होईल. दिवस शुभ.

कुंभ

आज भाग्यशाली दिवस आहे. आध्यात्मिक प्रगती ,प्रवास, आणि एखाद्या विशिष्ट स्थळाला भेट असा दिवस आनंदात जाईल. दिवस चांगला.

मीन

आज अष्टमात चंद्र थोडा त्रासदायक ठरू शकतो. घरातल्या प्रत्येकाचा विचार करून आज नियोजन करा. घरातले नाराज होऊ शकतात. दिवस मध्यम. शुभम भवतु

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya