मुंबई, 03 डिसेंबर: 2022 हे नवं वर्ष सुरू होण्यास आता जेमतेम महिन्याचा कालावधी राहिला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण विविध संकल्प करतात. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे (Corona) त्रस्त झालं आहे. त्यामुळे आगामी वर्ष यातून निश्चित दिलासा देईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी (Jobs) गमवावी लागली आहे. दुसरीकडे, नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले सुशिक्षित युवक नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशा प्रकारच्या अनिश्चिततेच्या वातावरणात काही जणांची पावलं ज्योतिषशास्त्राच्या (Jyotish Shastra) दृष्टिकोनातून भविष्याचा वेध घेण्यासाठी वळतात. नवं वर्ष कसं जाईल, नोकरी, व्यवसायात प्रगती होईल का, आदी प्रश्नांची उत्तरं ज्योतिषतज्ज्ञांकडून जाणून घेतली जातात. 2022 या नव्या वर्षाचा विचार केला, तर 12 राशींपैकी 4 राशींच्या व्यक्तींना (Zodiac Sign) करिअर (Career), नोकरीच्या दृष्टीनं हे वर्ष आश्वासक ठरण्याची शक्यता आहे, असं मत ज्योतिष अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. याबाबतची माहिती `झी न्यूज`ने प्रसिद्ध केली आहे. नोकरी मिळेल का (Jobs predictions for rashi in 2022), नोकरीत बदल होईल का, प्रमोशन- इन्क्रिमेंट मिळेल का असे प्रश्न असणाऱ्या या चार राशींच्या व्यक्तींसाठी 2022 हे वर्ष निश्चितच आश्वासक ठरण्याची शक्यता आहे, असं ज्योतिष अभ्यासक सांगतात. कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2022 हे वर्ष लाभदायी ठरणार आहे. या वर्षात उत्पन्नवाढीचेही योग आहेत. पद आणि पैसे या दोन्ही गोष्टी मिळतील. व्यावसायिकांना मोठा लाभ होईल. नोकरी किंवा व्यवसायात बदल केल्यास त्यातून फायदा होईल. करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष लाभदायक ठरेल. धनू (Saggirattus) : धनू राशीच्या व्यक्तींना 2022 हे वर्ष नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विशेष फलदायी ठरेल. नोकरीकरिता मुलाखतीसाठी दीर्घ काळ तयारी करणाऱ्यांना सफलता मिळेल. मोठं पद मिळण्याचीही शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना निश्चित यश मिळेल. 2022मधले शेवटचे तीन महिने विशेष शुभ आहेत. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास होईल. एखादी व्यक्ती सतत उशिरा का येते? यामागेही दडलं आश्चर्यचकित करणारं विज्ञान; वाचाच कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींना भलेही 2022 च्या सुरुवातीला करिअरच्या बाबतीत समस्यांचा सामना करावा लागला, तरी तुमच्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्यांना त्यात यश मिळू शकेल. काहींना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील आणि उत्पन्न वाढेल. वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींना 2022 हे वर्ष वरदान ठरेल. करिअरमध्ये अत्यंत चांगल्या संधी मिळतील आणि त्यामुळे भाग्य उजळेल. मुलाखती, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. बेरोजगार युवकांना नोकरी मिळेल. गुरूच्या कृपेमुळे प्रमोशन (Promotion), इन्क्रिमेंट मिळेल. एकूणच करिअरच्या दृष्टिकोनातून 2022 हे वर्ष उत्तम असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







