• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: कन्या आणि तुला राशीने घरातल्या सदस्यांची काळजी घ्यावी, वाचा आजचं 12 राशींचं भविष्य

राशीभविष्य: कन्या आणि तुला राशीने घरातल्या सदस्यांची काळजी घ्यावी, वाचा आजचं 12 राशींचं भविष्य

आज शुक्रवार दिनांक 25 जून 2021. आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा आहे. आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Share this:
आज शुक्रवार दिनांक  25 जून 2021.आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा आहे.  चंद्र आज धनु राशीत भ्रमण करेल. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ  राशी बद्दल .राशी चक्रातील ही अकरावी रास. स्थिर, शुभ वायू तत्त्वाची रास असुन शनि राशी स्वामी आहे. या राशीचे चिन्ह कुंभ अथवा  घडा हे असून  ह्या व्यक्ती  बुद्धिमान  असतात. अनेक नामांकित  ज्योतिषी, शास्त्र कार, उच्च  पदावर असलेल्या  व्यक्ती या राशीत जन्माला येतात.मध्यम उंची. गोल चेहरा  ,केस लौकर कमी होतात. कपाळ भव्य  असते. तेजस्वी  व्यक्तिमत्त्व असते. न्याय प्रिय, पण हिशेबी लोक असतात. शनिचा जप  व उपासना करावी. आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज भाग्यवंत राशीचा मान मेष राशीला आहे. गेले  दोन दिवस मानसिक ताण जाणवत असेल तो आता कमी होईल. पूजेत मन रमेल. घरात  कोणाशी शाब्दिक चकमक उडाली तरी काळजी नको. घरात अचानक  बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी  कष्ट कराल. दिवस  शुभ. वृषभ थोडे जपून रहा  असा आजचा दिवस  सुचवतो आहे. अष्टमात चंद्र  भ्रमण  मानसिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील बुध राहू संभ्रमात पाडतील. कामाच्या ठिकाणी जपुन वागा. बहीण भावंड विनाकारण नाराज होतील. दिवस  मध्यम आहे. मिथुन धनस्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र  आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत  आर्थिक नियोजन करण्याचे विचार, सध्या जरा  सांभाळून  करा. नुकसान  होणार नाही  अशीच गुंतवणूक करा. जोडीदारासोबत  दिवस  आनंदाने व्यतीत करा. कर्क राशीतील मंगळ चंद्राशी षडाष्टक करीत आहे. जपून रहा  प्रकृती सांभाळा. अति कामाचा ताण घेऊ नका. जोडीदार कधीतरी  नाराज होईल. ग्रहस्थिती फारशी  अनुकूल नाही. पण लवकरच  ठीक होईल. मारुतीची उपासना करणे योग्य. सिंह या राशीच्या व्यक्ती  आज आनंदी  असतील. नाव लौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. व्यय स्थानातील शुक्र मंगळ नाहक खर्च किंवा  चैनी कडे कल दाखवत आहेत. तिकडे लक्ष असू द्या. दिवस  चांगला . कन्या तुम्हाला तसाच  घराचा ओढा  जास्ती  असतो  आज तर सगळा वेळ  घरासाठी  काही विशेष काम कराल. एकूण दिवस चांगला आहे.पण मुलांशी  वाद नको. त्यांच्या  प्रकृतीची  काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी खर्च करावा लागेल. तुला छोटे प्रवास, त्याची तयारी, किंवा आखणी करण्यात आजचा  दिवस घालवाल. काही महत्त्वाचा  संवाद आज घडू शकतो. फोन ईमेल, याद्वारे  जन संपर्क घडेल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी  घ्या. वृश्चिक आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान  यात आज  वाढ होईल. खरेदीचे  मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी  काही वस्तूंची खरेदी  कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची  कदर  कमीच होते. थोडक्यात आणि सौम्य  बोला. शुभ दिवस. धनु राशीतून होणारे  चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल. अष्टम मंगळ शुक्र  आहे. प्रकृतीच्या  किरकोळ तक्रारी कडे लक्ष द्या. अति खर्च,प्रवास नको. आर्थिक  स्थिती  ठीक राहील. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला. मकर आज दिवस  फारसा  अनुकूल नाही. शनी मंगळ प्रतियोग, व्यय स्थानातील चंद्र  व पंचमात राहू , सांभाळून रहा असे  सुचवत आहे. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या साठी काही निर्णय  घ्यायचे असतील  तर घ्या. दिवस  मध्यम आहे. कुंभ दिवस लाभ मिळवुन देणारा  आहे. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल.  मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही  खर्च ही होईल. धार्मिक कार्या मध्ये मन रमेल. नियमाने उपासना करा. मीन नौकरी व्यवसायात आज फार दगदग होणार  आहे. मंगळ शुक्र  कोणी नवीन व्यक्तीची  भेट दर्शवतात. दिवस भर  कामाचा ताण राहील. धार्मिक बाबी  किंवा पूजा यासाठी खर्च  होईल. त्याची तयारी कराल. दिवस  चांगला  आहे. शुभम भवतु!!
Published by:Prem Indorkar
First published: