मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /2022 मध्ये शनीचा राशिबदल; 'या' 3 राशींच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा होणार

2022 मध्ये शनीचा राशिबदल; 'या' 3 राशींच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा होणार

29 एप्रिल 2022 रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशिबदलामुळे काही राशींवर प्रभाव पडणार आहे.

29 एप्रिल 2022 रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशिबदलामुळे काही राशींवर प्रभाव पडणार आहे.

29 एप्रिल 2022 रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशिबदलामुळे काही राशींवर प्रभाव पडणार आहे.

  मुंबई, 15 डिसेंबर : नवं वर्ष (New Year 2022) अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. प्रत्येकाला नव्या वर्षाकडून भरपूर अपेक्षा असतात. तसंच नवं वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येत आहे, याबद्दल मनात उत्सुकता असते. ज्योतिषशास्त्रानुसार नवं वर्ष काही राशींसाठी (zodiac signs) फायदेशीर ठरणार असल्याचं दिसून येत आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशिबदलामुळे काही राशींवर प्रभाव पडणार आहे.

  शनी (shani) हा रागीट ग्रह मानला जातो. शनिदेव नाराज झाले आणि त्यांचा प्रकोप झाला तर मनुष्याचं जीवन नरकापेक्षा वाईट होऊ शकतं आणि साडेसाती मागे लागते, असं म्हटलं जातं; पण शनिदेवाची कोणावर कृपा झाली तर आयुष्यातले अडथळे दूर होतात आणि शुभ फळ मिळतं. ज्योतिषशास्त्रानुसार नव्या वर्षात तीन राशींवर शनिदेवांची शुभ दृष्टी राहणार आहे, असं वृत्त आज तकने दिलं आहे. त्यामुळे शनीच्या राशिबदलामुळे पुढचं वर्ष 3 राशींसाठी (3 Lucky Zodiac Signs) चांगलं असणार आहे. त्या तीन राशी कोणत्या हे जाणून घेऊ या.

  हे वाचा - क्या बात है! 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष ठरणार सुपरहिट; सर्व इच्छा होतील पूर्ण

  धनू (Sagittarius) राशीच्या लोकांचं नशीब नव्या वर्षात चमकणार आहे. या राशीच्या व्यक्तींना 2022 हे (New year Astrology 2022) वर्ष चांगलं जाणार आहे. नव्या वर्षात यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तसंच त्यांच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होईल. शिवाय, मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधीदेखील या राशीच्या व्यक्तींना येतील. बऱ्याच काळापासून लग्नासाठी प्रयत्न करत असलेल्यांना आगामी वर्षात चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या या राशीच्या व्यक्तींना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर 29 एप्रिलनंतर लाभाची शक्यता आणखी वाढेल.

  वृषभ (Taurus) राशीच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा राहणार असून, 2022 हे वर्ष खूप शुभ असणार आहे. 29 एप्रिल रोजी शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरवात होईल. नोकरी-व्यावसायिक जीवनात चांगल्या संधी मिळतील. रखडलेली कामं वेगाने पूर्ण होतील आणि सुख-समृद्धी घरात नांदेल. जमीन, वाहन खरेदी करायचं असेल, तर निर्णय घ्या, ही वेळ योग्य असणार आहे.

  हे वाचा - New Year 2022: 4 राशींच्या व्यक्तींचं करिअर नव्या वर्षात बहरणार; पगारातही होणार भरघोस वाढ

  नव्या वर्षात मेष (Aries) राशीच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे. शनीचा राशिबदल हा या राशीसाठी शुभ ठरेल. प्रशासकीय सेवा, कायदेशीर संस्था आणि इंधन उद्योगात काम करणाऱ्यांसाठी नवं वर्ष फायदेशीर ठरणार आहे. मेष रास असलेल्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, तर नोकरदारांची प्रगती होईल. नव्या वर्षात व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, New year, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs